Marathi Kavita – Kavitechi Kavita – कवितेचि कविता
कवि- अमित विक्रम पवार
ती सुचली, स्त्रवली आणि ओघळली
कुणा मनाच्या कोपऱ्यातून
अगदी आजकालच्या पावसासारखी
निस्वार्थी, हवी नकोशी, राहिलेली दाटून.
फोडल्या किती कोंडवाटा
क्षण आव्यक्त मनाची घुसमट
पेलल्या भावनांच्या लाटा
अनुभव बोचरे, काढली जळमटं
सुखा-दुखावणारे क्षण पेरून
ती व्यक्त होऊन झाली रिकामी
विचार नव्हता मनी प्रतिसादाचा
कौतुकाची थाप वाटे सन्मानी
….. अवि पवार