कवी : श्रीनिवास गेडाम
संपर्क : shrinivasgedam510@gmail.com
देव – Marathi Kavita Dev
त्या दिवशी अघटीत घडलं
विज्ञानाच्या हातून म्हणे कुणीतरी
जीवंत झालं…!
स्वर्ग, नरक,देव या कल्पनांना
आता पुर्ण विराम मिळाला….!
आस्तिक नि नास्तिक दोघंही
मनातून खूप खुश झाले…
आस्तिक म्हणाला, ” चला रोजची पुजेची
कटकट मिटली, आता हवं तसं
जगता येईल….हवं ते खाता येईल!”
नास्तिक वरवर देव मानत नव्हता
पण… नरकाच्या भितीनं तो ही
मनातून सदैव धास्तावला असायचा…
आता मंदीर, मस्जिदीचा वाद
उरला नव्हता, हिंदू मुस्लिम भाईभाईचे
नारे सगळीकडे लावले जात होते….
मथूरा, प्रयाग, काशी येथील
देवस्थानावर….फाईव्ह स्टार हाटेल्स
बांधण्याचे मनसुबे आखल्या जात होते
माणसाचे बदललेलं हे नव रूप
बघून देव खूप क्रोधीत झाला
त्यानं क्षणाचा विचार न करता
संपुर्ण मानवजातीवर…त्सुनामी पाठवलं
आता वाद करायला कुठलाच वाद
आणि माणूस शिल्लक राहिला नव्हता….!!!