कवयित्री : धरती.अ.वानखडे,अमरावती
संपर्क : 9890587920a@gmail.com
जय हरी विठ्ठल – Marathi Kavita Jay Hari Vitthal
अध्यात्मनगरी-पंढरी
विठोबाच्या दर्शनाला निघाले वारकरी
जल्लोषात कराया पंढरीची वारी॥
रायाच्या भेटीची ओढ लागली भक्ताला
वाट तुडवित निघाले हरीला बघाया॥
मुखी विठूचा गजर आणि रूप लोचनी
ईश्वराची भेट व्हावी हाच उद्देश मनी॥
चंद्रभागेच्या तटी उभी राहीली माऊली
ज्याचे अदभूत बोल व प्रेमाची सावली॥
डोई तुळशी वृंदावन आणि विठूरूक्माईंचा आशिर्वाद
”पांडुरंग हरी” एकच ओठी नाद॥
-धरती.अ.वानखडे