Marathi Movie Duniyadari Song Lyrics – दुनियादारी चित्रपटच्या गाण्यांचे बोल
सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित दुनियादारी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला, आणि सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात सुरू आहे.
चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट झाली आहेत.
यातीलच काही गाण्यांचे बोल.
*देवा तुझ्या गाभार्याला*
देवा तुझ्या गाभार्याला, उंबराच नाही. सांग कुठे ठेऊ माथा , कळणाच काही!
देवा कुठ शोधू तुला , मला सांग ना, प्रेम केल एवढाच, माझा रे गुन्हा!
देवा काळजाची हाक , ऐक एकदातरी , माझ्या या जिवाची आग राहुदे तुझ्या उरी!
आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू!
का, कधी, कुठे, स्वप्न विरले, प्रेम हरले
स्वप्न माझे, आज नव्याने खुलले, अर्थ सारे स्पर्शाने उलगडले!
आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू!
देवा काळजाची हाक , ऐक एकदातरी , माझ्या या जिवाची आग राहुदे तुझ्या उरी!
का रे तडफड ही, ह्या काळजामधी, घुसमट तुझी रे, होते का कधी!
माणसाचा तू जन्म घे , डाव जो मांडला, मोडू दे !
का हात सुटले श्वास मिटले , ठेच लागे ,
उत्तरांना प्रश्न, कसे हे पडले, अंतराचे अंतर कसे ना कळले,
देवा काळजाची हाक , ऐक एकदातरी , माझ्या या जिवाची आग राहुदे तुझ्या उरी!
आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू!
[tube]5OJCAxaNvzg[/tube]
*टिक टिक वाजते डोक्यात*
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
कभी जमीन, कधी नभी,
संपते अंतर झोक्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
नाही जरी सरी तरी, भिजते अंग पाण्याने,
सोचु तुम्हे पल भर भी, बरसे सावन जोमाने,
शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
सूर ही तू, ताल ही तू, रुठे जो चांद वो नूर है तू,
आंसू ही तू, हासू ही तू, ओढ मनाची नी हूर हूर तू,
रोज तुझे भास नवे, वाढते अंतर श्वासात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
कभी जमीन, कधी नभी,
संपते अंतर झोक्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात,
[tube]A4snplP4_Wk[/tube]
*दुनियादारी*
जिंदगी जिंदगी जिंदगी हान जिंदगी..
दोस्तों की दुनियादारी मै हसिन मेरी जिंदगी
ऐसा कया हुआ रे,
ऐसा क्यु हुआ रे,
थॉटचा हा शॉट नको रे,
थोडा कश मारले,
सावकाश मारले, हलकी हलकी किक बसू दे,
सारे गम छोडदे, एक दम ओढले,
स्मोक मै ही, होप है प्यारे,
मै जिन्दगीका साथ निभाता चला गया..
हर फिक्र को धुंवे मै उडाता चला गया ..
साला ही गैंगच वेगळी,
कट्टा गैंग
सगळ्यांची आपली ओळख झाली.
हा अशकया हा कुणाचाच नव्हता.
तरीही गॅंगचा.
हे उम्या आणि श्री,
हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्या सारखे,
कुठेही गेले तरी एकत्र,
आता राहिले सॉरी आणि नितिन,
यांची दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली ..
सॉरी सॉरी म्हणत म्हणत, या जगी हा आला रे,
हात मै है कन्फुजन, गडबड घोटाला रे,
दस का बीस करने मै, शातीर ये साला रे,
झोल झोल करुनि, तरी ठण ठण गोपाळा रे,
अरे यारी मै सॉरी आये तो गलत है,
पर आपने सॉरी की तो बात अलग है,
ये झोलर, कमीना,
सोचता कभि ना,
यारि मै ही झोल छुपा है,
झोल मै ही यारी छुपी है,
मै जिन्दगीका साथ निभाता चला गया..
हर फिक्र को धुंवे मै उडाता चला गया ..
दिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो,
दिघ्या आपला पहिला फ्रेंड,
आणि त्याच बरोबर मला कळलेल दिघ्याचे पहिले प्रेम ,च्याआईला,
लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस,
प्रेमाच्या लफड्यात मात्र …हाहाहा
होsss जेव्हा पाहिले हिला ये दिल हिल्ला हिल्ला,
सारा जिल्ला हिल्ला , हुआ रे जलजला
घराच्या सामोरी नजरेची शाळा ही, रोज रोज भरवायची हाय,
लैला नि मजनूची सॅडवाली लवस्टोरी आपल्याला बदलायची हाय ,
ही सुरेखा , आपल्याला पटलेली हाय ,
अरे खिडकीमधून कशी लाजून हसलेली हाय,
अरे हसली हसली ती तर फूल टू फसलेली आहे..
हसलेली हाय, फसलेली हाय, या दिघ्याला पटलेली हाय
कधी ह्यांचे होऊन गेले कळलेच नाही,
एक वेगळीच दुनिया ,
एक वेगळीच दुनियादारी ..
मै जिन्दगीका साथ निभाता चला गया..
हर फिक्र को धुंवे मै उडाता चला गया ..
दोस्तों की दुनियादारी मै हसिन मेरी जिंदगी
जिंदगी जिंदगी जिंदगी हान जिंदगी..
[tube]mjDMvty62sA[/tube]