Winner of MarathiBoli Competition – मराठीबोली लेखन स्पर्धेचे विजेते
मराठीबोली लेखन स्पर्धेचे विजेते सागर दिवटे यांचे मनोगत.
हा लेख २० डिसेंबर २०१३ ल निकाल लागलेल्या मराठीबोली साहित्य स्पर्धे विषयी आहे. या स्पर्धेत संपूर्ण ८ लेख व कवितांचा समावेश होता. त्यात अनन्या या प्रतियोगीच्या २ कविता आणि १ लेख होता. संजय पाटील या प्रतियोगीचा १ लेख होता. रविकिरण चौगुले या प्रतियोगीचा १ लेख होता . अमृता आणि प्रसाद यांचा प्रत्येकी एक लेख तर माझी एक कविता होती. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना आणि स्पर्धकांना मना पासून शुभेच्छा . पण मला या स्पर्धेमुळे निकाला व्यतिरिक्त खूप सार्या गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या. परंतु पहिले मला सर्व स्पर्धकांचे साहित्य वाचून जे त्यांच्या पदधल वाटलं त व्यक्त करायचं आहे.
अनन्याने बोन्साय कवितेत जसे एका बोन्साय हे आणि का मनुष्याचे साम्य दाखवले ते मनाला भावले. तसेच कास पठाराचे वर्णन इतके सुरेख होते की आपण कास पठारावर आहोत असे वाटले. आणि जगण्याच अर्थ मधे एका नवीन रोपट्याच्या आयुष्याचे वर्णन असे केले आहे की आपलेच आयुष्य आहे. एकूणच तिच्या लेखांमधे निसर्गाचे विविध पैलू आणि त्याचे माणसाच्या आयुष्याशी समांतर वर्णन आहे. आता वार्ता करूया संदीप पाटील यांच्या नशिबाने दिले आणि कर्माने नेले या लेखा पदधल. या लेखानी मला आपण जिंकत असताना थोड्याश्या लापरवाही मुळे हरू शकतो असा संदेश दिला. अमृताचा लेख रीसायकलिंग चा संदेश देतो. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी आपणही हातभार लावावेत असे वाटते. प्रसाद चा मराठी संस्कृतीचा लेख मराठी सणांचे महत्व सांगतो. आणि शेवटी रविकिरण यांचा भाषांतरित लेख त्यांच्या मराठी शब्द कोशाची लक्षणीय झलक दाखवतो.
मराठीबोलीच्या साहित्य स्पर्धेमुळे मला खूप चांगले मराठी साहित्य वाचावयास मिळाले. ते वाचून आपणही असेह चांगले लिखाण करू शकतो ही प्रेरणा मिळते.
मला मराठीबोलीच्या या लेखन स्पर्धे विषयी काय वटळते मी या लेखातून व्यक्त केले आहे. मराठी लेखकांना जागा समोर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या पदधल पुन्हा एकदा मराठीबोलीचे अभिनंदन .
– सागर दिवटे.