Marathi Culture – मराठी संस्कृती

0
2686

Marathi Culture – मराठी संस्कृती

Marathi Culture

मराठी संस्कृती म्हणलं कि डोळ्यासमोर उभा राहतो धगधगता इतिहास.

डोळे दिपून टाकणारी पेशवाई. गडकोट किल्ल्यांचे सर्वेसर्वा छत्रपति श्रीमान योगी राजमान्य राजर्षी शिवाराजे शहाजीराजे भोसले. आपसूकच मान तुकवून मुजरा झाडतो राजांना.

नसनसात रक्त उसळतं. फडकता भगवा जगतो त्यांचा स्मृती.

मराठी संस्कृती म्हणलं म्हणजे सण-उत्सव दिसतात. चैत्राचा गुढीपाडव्यापासून ते फाल्गुनातल्या होळीपर्यंत आपण मश्गुल असतो प्रत्येक दिवशी.

चैत्र-गुढीपाडवा.
वैशाख-नृसिंह जयंती.
जेष्ठ-हळदीकुंकू.
आषाढ-नारळी पौर्णिमा.
श्रावण-मंगळागौर आणि सत्यनारायण पूजा.
भाद्रपद-गौरी-गणपती.
अश्विन(पौर्णिमा)-कोजागिरी पौर्णिमा.
अश्विन(द्वादशी)-वसुबारस.
अश्विन(त्रयोदशी)-धनत्रयोदशी.
अश्विन(चतुर्दशी)-नरकचतुर्दशी.
अश्विन(अमावस्या)-लक्ष्मीपूजन.
कार्तिक(प्रतिपदा)-दिवाळीतला पाडवा.
कार्तिक(द्वितीया)-भाऊबीज.
कार्तिक(द्वादशी)-तुलसीविवाह.
मार्गशीर्ष-गुरुवारचे उपवास.
पौष-मकरसंक्रांत.
माघ-गणपती जन्म.
फाल्गुन-होळी.

मराठी संस्कृती म्हणलं म्हणजे मंगळागौरीचे खेळ आले.

मराठी संस्कृती म्हणजे भोंडला आला.

मराठी संस्कृती म्हणजे पुरणाची पोळी.

मराठी संस्कृती म्हणजे श्रीखंड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here