SwiftKey – Android मोबाइल मध्ये जलद टायपिंग कसे करावे..

0
1066

SwiftKey – Android मोबाइल मध्ये जलद टायपिंग कसे करावे..

Android फोन्स सध्या भारतात सर्वाधिक विकले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे स्वस्त फोन्स आणि अनेक मोफत Application चा खजिना ..

सध्या अनेकांच्या हातात टचस्क्रीन असलेले मोबाइल फोन्स पाहायला मिळतात…

पण या फोन्सवर टायपिंग करणे कितपत सोपे आहे?…काय यावर वेगाने टायपिंग करता येते?

असा प्रश्न जर आपल्या मनात पडला असेल तर त्याचे उत्तर “होय” असेच आहे..

SwiftKey हे नवीन Android मोबाइल साठीचे अॅप्लिकेशन आहे.. ज्याच्या मदतीने Android फोन्समध्ये टायपिंग करणे अधिक सुलभ होते ..

SwiftKey Application च्या मदतीने आपण आपल्या मोबाइल वर वेगाने आणि अगदी सोप्या पद्धतीने टायपिंग करू शकता. SwiftKey आपण टाइप केलेला शब्द पूर्ण होण्या आधीच तो ओळखते आणि आपल्याला तसे पर्याय सुचवते, यामुळे टायपिंग वेगाने तर होतेच आणि त्याबरोबर ते योग्य असेच होते.

SwiftKey Application आपला वेळ तर वाचवतेच त्याबरोबर आपले कष्ट सुद्धा कमी करते.

SwiftKey Application हे Natural Language तंत्रज्ञानावर काम करते. आपल्या टायपिंग मधून आपली वाक्याची रचना, आपण नेहमी वापरणारे शब्द शिकून हे अॅप्लिकेशन आपल्याला योग्य पर्याय सुचवते. आपल्या अनेक चुका हे अॅप्लिकेशन स्वतच सुधारते..

हे अॅप्लिकेशन गुगल प्ले मध्ये मोफत उपलब्ध आहे..

खालील विडियो मध्ये आपल्याला अधिक माहिती मिळेल.

[tube] 3hQT-o8ch0o[/tube]

डाउनलोड करण्या साठी येथे क्लिक करा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here