Sanshaykallol Marathi Movie Review – संशयकल्लोळ
संशयकल्लोळ.. नात्यांचा गडबडगुंडा
जेव्हा नात्यांमधे संशय निर्माण होतो तेव्हा नात्यांचा कसं गडबडगुंडा होतो … तो म्हणजेच संशयकल्लोळ
अंकुश चौधरी, गौरी निगुडकर, पुष्कर क्षोत्री, मृण्मयी देशपांडे, संजय खापरे, ओंकार गोवर्धन, क्षिति जोग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या संशयकल्लोळ हा एक धमाल विनोदी चित्रपट.
जयसिंह(अंकुश चौधरी) एक छायाचित्रकर आहे तर त्याची बायको आशा हिचे बुटीक त्याच्याच स्टूडिओच्या समोर, दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम, पण दोघांचाही स्वभाव संशयी.. दोघांचा एकमेकांवर एवढा संशय की दोघांनी एकमेकांवर लक्ष्य ठेवायला सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला.
धनंजय उर्फ धनू (पुष्कर क्षोत्री) हा एक व्यावसायिक तर श्रावणी(मृण्मयी देशपांडे) ही टीव्ही मालिकेत काम करणारी एक नटी. धंनजयला श्रावणी आवडायला लागते, पुढे तो तिच्याच मालिकेचा निर्माता बनतो. दोघांचे प्रेम जमते …
पण त्यांच्या मध्ये संशय निर्माण करण्याचे महत्वाचे काम करतो तो रिक्षावाला भुजंग (संजय खापरे).
श्रावणी एकदा जयसिंग कडे फोटोसेशन करत असते त्यावेळी तिला चक्कर येते आणि जयसिग तिला सावरतो, पण आशा या घटनेवर गैरसमज होतो आणि सुरू होतो संशयकल्लोळ..
या चारही मुख्य पात्रांना एकमेकांशी काही जोडत असेल तर तो म्हणजे संशय..
चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होतो, चित्रपटाचे कथानक खरोखरच विनोदी आहे, मुख्य म्हणजे विनोद हा सहज होतो तो कुठेही ओढून ताणून आणल्यासारखा नाही वाटत . विनोद निर्मितीसाठी उगाच चेहर्याचे विचित्र हावभाव न करता शब्दातून विनोद निर्मिती केली आहे. परिस्थिति अनुरूप विनोद पाहावयास मिळतात.
मृण्मयी आणि गौरी दोघींचा पहिलाच विनोदी चित्रपट असला तरी दोघींनी अंकुश आणि पुष्करला खूपच छान साथ दिली आहे, दोघींचाही अभिनय उत्तम.
चित्रपटात दोन गाणी आहेत, ती पण परिस्थितीनुरूप ‘नकळत सारे’ हे रोमॅंटिक गाणे खूपच छान तर चित्रपटच्या शेवटी असलेले गडबडगुंडा हे पण मस्तच.. कौशल ईनामदार यांचे खूपच छान संगीत.
चित्रपटाची कथा, संवाद, चित्रीकरण, गाणी, लोकेशन्स सगळेच उत्तम …
निखळ मनोरंजनासाठी आणि पोटधरून हसण्यासाठी.. चित्रपट नक्की पहावा …