Yeda Marathi Movie – मराठी चित्रपट ‘येडा’

0
8389

Yeda Marathi Movie – मराठी चित्रपट ‘येडा’

येडा म्हणजेच वेडेपणा… वेडेपणा किंवा विकृतींवर आधारित येडा आंधळी कोशिंबीर संपली …

yeda marathi movie

चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे, याचे कारण आशुतोष राणा चे मराठीत पदार्पण.. आशुतोष राणा यांची पत्नी रेणुका शहाणे या मराठी आहेत त्यामुळे त्यांच्या घरात अनेकदा मराठीच बोलली जाते, तरीसुद्धा येडा या चित्रपटातील संवादावर आशुतोष ने खूप मेहनत घेतली.

चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.. या वेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे आशुतोष राणा, दिग्दर्शक किशोर बेळेकर, सतीश पुळेकर, अनिकेत विश्वासराव, किशोरी शहाणे आणि चित्रपटची संपूर्ण टिम उपस्थित होती.

दिग्दर्शक किशोर बेळेकर यांचा हा दूसरा मराठी चित्रपट, या चित्रपटा आधी त्यांनी स..सासूचा हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘येडा’च्या दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा लेखन किशोर  बेळेकर यांनीच केले आहे

मैत्र एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘येडा’ हा चित्रपट १९ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.

चित्रपट हा अप्पा कुलकर्णी (आशुतोष राणा) यांच्या भूमिके भोवती फिरतो. एक थरारक उत्कंठावर्धक असा येडा चित्रपट रामनवमीला म्हणजेच १९ एप्रिल २०१३ ला प्रदर्शित होतोय …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here