MarathiBoli Competition 2016 – Marathi kavita – पहाड

0
2008

MarathiBoli Competition 2016 – Marathi kavita – पहाड

Marathi-Kavita
Image From – http://www.dmitrimarkine.com/

आई सह्याद्रीचा कडा ;बाप हिमालय माझा.
वादळांना रोखतोया ;नाही लेकरेंना ईजा.

झाली जर्जर वहाणं ;बाप तिलाच जपतो.
सूर्य येतो डोईवर; बाप उन्हात तापतो.

टाके सद-याला त्याच्या; तरी नाही घेतं नवा.
माझा “बा” लय मोठा; जळे लामणदिवा.

पोरं उपवर झाली ;  नाही डोळ्यात नीज .
फरफट पोरीसाठी ; त्याच्या पायामधी वीज

पैका पैका जमवितो ; नाही घडीचा विसावा.
माझ्या कवितेचा हिरो  ; “बा” सुखात दिसावा ;

बाप पहाडा सारखा; आभाळही पुढे थिटे
माह्या चामड्याची चप्पल; ऋण तरी नाही फिटे.

श्री. धनाजी जनार्दन बुटेरे
पोई कल्याण ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here