Pipani marathi movie :- पिपाणी
पिपाणी…
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित पिपाणी हा चित्रपट शेतकर्यांच्या दैनावस्थेचे मनोरंजक पणे चित्रण करतो…
शेतकर्यांवर आधारित असे अनेक मराठी चित्रपट या आधीच येऊन गेले, तरी पिपाणी हा चित्रपट स्वतचा वेगळा ठसा निर्माण करण्यात यशस्वी होतो. चित्रपटात एका जर्मन अभिनेत्रीने देखील उत्तम अभिनय केला आहे.
पिपाणी मध्ये मकरंद अनासपूरे , क्रांति रेडकर, रमेश देव, वैभव मांगले आणि जर्मन अभिनेत्री ख्रिस्तीन यांनि प्रभूक भूमिका केल्या आहेत.
हॉलीवुड ची एक दिग्दर्शिका मराठी कलावंतांना घेऊन चित्रपट बनवण्यासाठी विदर्भात येते…
आणि तिच्या समोर उभा राहतो तो एक वेगळाच गाव, जिथे अनेक वाद आहेत,सरकारी मोहिमा आणि राजकारणा मध्ये होरपलेला गावकरी आहे, समदुखी सरकारी नोकर आहेत, रिकामटेकडे आणि बेरीजगर तरुण आहेत..
या सर्वांचे वास्तविक चित्रण करत असताना दिग्दर्शिका एका मोठ्या समाजाला भेटते….आणि सुरू होतो त्या समाजाला पडद्यावर दाखवण्याचा प्रवास..
अशी या चित्रपटची थोडक्यात कथा…
खरे तर हा चित्रपट खूपच इमोशनल, तरी पण दिग्दर्शकाने प्रत्येक भावुक क्षणा नंतर लगेजच एखादा विनोदी क्षण टाकला आहे…त्यामुळे चित्रपटाच अधिकच मनोरंजक झाला आहे ..
असा हा उत्तम संगीत, कथा आणि कलाकारांनी नटलेला पिपाणी हा सिनेमा …नक्कीच पाहावा..
Aamcha gawath (shardale) shuting jahalibadal THANK YOU………..