भारतीय आहारातील हळद, लसूण व तत्सम पदार्थ हे नेहमीच आरोग्यासाठी गुणकारी असल्याचे सिद्ध झालेले आहे. आता भारतीय स्वयंपाकात सामान्यपणे वापरले जाणारे आले हे दीर्घकालीन मधुमेहावर रामबाण औषध असून त्याने रक्तातील सारखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यात मदत होते, असा दावा सिडनी विद्यापीठातील अभ्यासकांनी केला आहे.
ब्युडेरिम प्रजातीचे आले इन्सुलिनच्या वापराशिवाय रक्तातील शर्करा शोषून घेण्याकामी मांसपेशींना मदत करते, असे या संशोधनात सिद्ध झाले आहे. ‘प्लॅटा मेडिका’ या विज्ञान नियतकालिकात या विषयावरील शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. सिडनी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक बॅसिल रोफोगॅलिस यांच्या चमूने हे संशोधन केले आहे. त्यांच्या ते दीर्घकालीन मधुमेहींना रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राखण्यास आल्यातील एक घटक उपायकारक ठरू शकतो. याच संशोधनात आल्यातील मूलस्तंभ पेशी शर्करा शोषून घेण्याचे प्रमाण वाढविण्याबरोबरच ग्लुय-4 हे प्रथिन मांसपेशींमध्ये वाढविण्यास मदत करतात, असेही दिसून आले आहे.
diabetes