नाही कसूर माझा – Marathi Kavita – Nahi Kasur Maza

0
723

Marathi-Kavita-Nahi-Kasur-Maza

कवयित्री – मेघा कुलकर्णी
संपर्क – meghakulkarni16@gmail.com

नाही कसूर माझा – Marathi Kavita – Nahi Kasur Maza

नाही कसूर माझा दैवात हार सारी
रामावरीच आता आहे मदार सारी

झाले करून सारे काहीच शेष नाही
हे जानकीपते ही चिंता निवार सारी

राजीवलोचना ये धावीत वेळ नाही
सोसे मला न आता माझीच हार सारी

आहेस तूच त्राता, आहेस प्राण माझा
आकाश तू धरा तू, तू ही बहार सारी

तू ऐकतोस साऱ्या हाका लहान मोठ्या
ही ऐक आज आता तक्रार हार सारी

मेघा कुळकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here