Marathi kavita – महाराजा यशवंतराव होळकर

0
2347

Marathi kavita – महाराजा यशवंतराव होळकर

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजाधिरज राज-राजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर (जन्म- ०३ डिसेंबर १७७६, राज्याभिषेक- ०६ जानेवारी १८०१, मृत्यू- २७ ऑक्टोबर १८११) म्हणजे भारतीय इतिहासातील एक लखलखते व्यक्तिमत्व ! भारतमातेच्या या सच्चा वीरपुत्राच्या चरणी वाहिलेली शब्द-सुमने…

Maharaa-yashwantrao-holkarj

जानुनी घेऊ महाराजा यशवंत ।
इतिहास घडविला ज्याने, या भारतभूमीवर ।।

वीरपुत्र जन्मला महाराष्ट्रात, घेऊनिया नाव यशवंत ।
शत्रू ही थरथरे रणांगणी, अशी झुंज देई बलवंत ।।

कोसळली अनेक दु:खे जीवनात, तरी राही जो सदा धीरवंत ।
परिसीमा नसे धाडसाची, हरेक युद्धांत साहस किर्तीवंत ।।

जसे शक्तीला जोड युक्तीची, तसे युद्धशास्त्रात बुद्धिवंत ।
द्यावा दाखला महायोद्ध्याचा, असे उदाहरण मुर्तिमंत ।।

अनेक भाषेंवर प्रभुत्व ज्याचे, असा महाराजा प्रज्ञावंत ।
सर्व राजभोग असुनि पदरी, असे जो जीवनभर नीतिवंत ।।

जीवनभर लढला महावीर, करण्या राष्ट्र ‘महायशवंत’ ।
जनजन वाहती ज्याला नित्य स्तुतीसुमने, असा यशवंत प्रजावंत ।।

जरी विसावला असला वीर, तरी प्रेरणा राहिल चिरंतर ।
अजूनही प्रेरित होतात देह, मुखी फक्त नाव घेता यशवंत ।।

असे सर्व गुण संपन्न, होता तो गुणवंत ।
समजूनी घ्यावा, महाराजा यशवंत ।
आचरणात आणावा, महाराजा यशवंत ।
इतिहास घडविला ज्याने, या भारतभूमीवर ।।

– मिलिंद डोंबाळे (देशमुख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here