Marathi Kavita – स्वच्छंद पाऊस

0
6620

भरून आलेले आभाळ, हिरवागार निसर्ग अन रिमझिमणारा, बरसणारा , कधी सौम्य तर कडी रौद्र रूप धारण करणार पाऊस , काही तर सुचवून जातोच आणि न राहवून शब्द मनातून कागदावर उतरतात अलगद , श्रावण सारीसारखे .
या काही कविता केवळ पावसावरच्या , वर्षा रुतुनी सुचवलेल्या . काही खूप आधीच्या आणि काही अगदी परवा परवाच्या .काही आधी वाचल्याही असतील तुम्ही, काही नव्या आहेत . कविता म्हणून , कदाचित खूप प्रतिभावान नसतील हि हे शब्द , पण हे शब्द खळखळ वाहन्र्या निर्झारासारखे शुभ्र , अवखळ आणि मनपासून वाहणारे आहेत . काही कविता माझ्या आणि पावसाच्या

  1. स्वच्छंद पाऊस

Marathi-kavita-paus

रिमझिम रिमझिम पाऊस  मातीचा ओला गंध
तप्त धरणी वर कसा बरसे स्वच्छंद
अवचित अस आभाळ आले की मन पण कसे भरून येते
आठवणीच्या शिडकवा होवून  आंगण सारे भिजुन जाते

पावसानी खर तर असे  न सांगता येवू नयेच
अन् जर आलच जर  अनाहूत पाहुणा बनून
तर असा अशी हुरहुर   लावून परतू नये
काय माहित हे सरसर शिरवे अस काय घेवून येतात
की मृदगंध दरवळताच मनाचा ठाव घेवून जातात
पाऊस आला की न भिजता पण ,  आपण जरा चिंब होतो
आपल्याल्या भावलेला एखादा पावसाचा थेंब ,आपल्या तळ हातावर अलगद झेलतो
बाहेरचा पाऊस त्याच्याच सूरात गात असतो ,अणि

आपल्या आतला पाऊस , मनात दडलेला मेघ मल्हार अळवत बसतो
पाऊस तोच असला तरी, प्रत्येक वेळी नवा भासतो
कधी आठवांचे आसव घेवुन येई ,तर कधी मजकडे पाहून खट्याळ हसतो
पाऊस थांबला तरी , चिंब मन थांबले कुठे
हरवले जावूंन ते ,मेघांच्या गर्दीत पिसे

-शीतल

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here