Marathi Movie Govinda Review – मराठी चित्रपट गोविंदा – चित्रपट परीक्षण

0
1768

Marathi Movie Govinda Review – मराठी चित्रपट गोविंदा – चित्रपट परीक्षण

Marathi Movie Govinda Review

 

आत्माराम धर्णे दिग्दर्शित आणि विलासराव वाघमोडे निर्मित गोविंदा चित्रपट मागील आठवड्यात प्रदर्शित झाला.

स्वप्नील जोशी , गिरीजा जोशी, अरुण नलावडे, उदय टीकेकर आणि विद्याधर जोशी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे मार्केटिंग तसे चांगले होते आणि नुकत्याच प्रदशीत झालेल्या दुनियादारी, टाइमप्लीज , ७२ मैल एक प्रवास असे चित्रपट मराठी प्रेक्षकांना  चित्रपट गृहात खेचण्यात यशस्वी झाले. दुनियादारी चित्रपटाने तर या पूर्वीचे मराठी चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले.

म्हणूनच गोविंदा य चित्रपटकडून रसिकांच्या खूप अपेक्षा होत्या.

पण

एकामागोमाग उत्तमोत्तम चित्रपट देणार्‍या मराठी चित्रपटसृष्टीला ब्रेक लावला तो गोविंदा या चित्रपटाने.

Marathi Movie Govinda Review

चित्रपटात कलाकारांचा अभिनय आणि रोहण प्रधान यांचे थीरकायला लावणारे संगीत मस्त आहे. पण चित्रपटाची कथा रसिकांसमोर मांडण्यात दिग्दर्शक अपयशी ठरतो. चित्रपट सिनेमॅटोग्राफी आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये कमकुवत ठरतो.

गोइंदा ही कथा आहे, एक राजन नामक युवकाची जो सोसायटीच्या मंडळाचा अध्यक्ष्य आहे आणि प्रत्येक सण तो या सोसायटीत साजरा करतो. तो याला इवेंट मॅनेजमेंट म्हणून सांगतो तर घराचे त्याच्या याच इवेंट मॅनेजमेंट ला नसती दुनियादारी म्हणतात.

आश्यातच राजन एका नेत्याच्या संपर्कात येतो आणि  या नंतर राजन वर जी संकटे सुरू होतात आणि राजन त्या संकटांना कसे सामोरे जातो त्याची ही कथा म्हणजे गोविंदा.

चित्रपटामध्ये सगळे प्रसंग एका मागोमाग एक असे वेगाने घडत असतात त्यामुळे कोणताही प्रसंग पुर्णपणे खुलवण्यात दिग्दर्शकाला अपयश आले आहे.

रोहन प्रधान यांचे संगीत उत्तम आहे. स्वप्नील जोशी आणि नवोदित गिरीजा जोशी यांचा अभिनय उत्तम.

स्वप्नील च्या अभिनयासाठी चित्रपट पाहायचा असेल तर नक्की पहा … नाहीतर चित्रपटाची गाणी गोविंदा , गणपतीत लावून त्यावर मनसोक्त नाचा…

[tube]mMioQA0dsCM[/tube]

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here