नाते संबंध – Marathi Kavita Nate Sambandh

0
3601

Marathi-Kavita-Nate-sambandh

कवयित्री – मनीषा खालकर
संपर्क – manishakhalkar724@gmail.com

नाते संबंध – Marathi Kavita Nate Sambandh

अलौकिक स्नेहाचे बंध जपले सुधाकरने
प्रेम ‘भावात’ मापते वसुंधराही ओजंळीने

लखलखात दिशा आसमंतही उजळतो
सोनेरी दिवा सड्याने उबंरडाही सजतो

पाजळून वात दिवा काजळीलाही सारतो
पुनवेचं नातं, रुपडं हळूच अवसेला देतो

स्री शक्तीचे नाते-बंध, पंचदिसाची दिवाळी
वाटचाल परंपरेची, जपे मानव सणावळी

मिणमिणत्या पणत्यातुनही उजळतो जागर
तेवत ठेवा उजेड नात्यांचा,बोध कन्येचा गजर

गो, धन, लक्ष्मीपूजन हे स्री सत्काराचे धर्म
पतीपुजन,भाऊबीज स्री नात्याने येई सणाला कर्म

ईडा, पीडा टळो, बळीच राज्य कांतास येवो
भावाचे प्रेम आजीवन बहिणीस सदा मिळो

नाते-संबधाचा गंध,मनी आरास करे सारे सण
माळूनी दिवे अंगणी,बघताच,हर्षाने सजे मन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here