Marathiboli Competition 2016 – ओढ….

0
1679

Marathiboli Competition 2016 – ओढ….

marathi-kavita-odh

नकळत लागते सखे
मला फक्त तुझी ओढ
तुला पाहण्यासाठीसाठीच चालु असते
माझ्या नजरेची चढा-ओढ

कधी जवळ वाटशी तु
दुर असुन ही माझ्या
कीती मनऊ मी तुला
आठवणी येतात गं तुझ्या

तुझी प्रित ही सखे
लाव्ण्याहूनही कीती छान
तुला पाहिले की सखे
लवलवते माझ्या मनाचे पान

तुझी ही अनमोल गोडी
मनाला माझ्या छ्ळ्ते
तु दुर असलीस की फक्त
तुझीच ओढ लागते

ओढ ही तुझी मला सखे
प्राणाहूनही प्रिय वाटते
कारण तुझ्याचसाठी ती
आजही जीव अर्पित करते

अशी ही सखे मला
तुझी ओढ जीवा लागते
तुझी ओढ जीवा लागते
तुझी ओढ जीवा लागते ……..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here