
Marathi Kavita – Bhakti – भक्ती
कवि – मयूर गुरव
आम्ही वारकरी सतत दंग नामात
हरिजप चालू नेहमी कामात
एकच ध्यास आम्हा पांडुरंगांची आस
नाही कुठला लोभ नाही हव्यास (1)
ज्ञानदेव रचीला पाया तुकाराम कळस झाले
सार्थ जीवणाचे ज्ञान अभंगात लिहिले
लोभ, क्रोध,मोह, माया, अहंकार सोडवा
मानवी जीवनाचा बोध घ्यावा (2)
करितों उपवास भक्तिने एकादशीला
नाही कुणी थोर लहान पंढरीला
सगळे पडती एकमेकां पाया
विठूची भक्तावर समान माया (3)
पुण्यवान असे संत बोध आम्हा सांगे
भजन, कीर्तन करुनी आम्हा सांगे
घ्यावा विचार महान हरिपाठाचा
करू मदत ,दान, व्रत समाजसेवेचा (4)
Auto Amazon Links: No products found.








