Marathi Kavita – Aaj Kaal – आजकाल
कवयित्री – प्रीती पाटील
भ्रमात होते कालपर्यंत
वास्तव स्वीकारतेय आजकाल,
नकोस होत जे कालपर्यंत
तेच हवंस वाटतंय आजकाल.
आठवत होते जे कालपर्यंत
तेच विसरतेय आजकाल.
विचार करत होते कालपर्यंत,
पण दुर्लक्ष करतेय आजकाल.
एकांत हवा होता कालपर्यंत
पण गोंगाट शोधतेय आजकाल
सहवास हवा होता जो कालपर्यंत
तोच नकोसा वाटतोय आजकाल..
पापण्यांना सर्दी होत होती कालपर्यंत
पण अश्रू जिरताय आजकाल…
त्याला शोधत होते कालपर्यंत
पण मीच मला सापडतेय आजकाल