Marathi Kavita – Corona Re Corona, Ka Aalas Re Tu Corona – कोरोना रे कोरोना का आलास रे तु कोरोना?
कवयित्री – भामरे भाग्यश्री शांताराम
कोरोना रे कोरोना
का आलास रे तु कोरोना?
तुझ्यावर नाही आहे कोणतेही औषध नाही, आहे कोणता उपचार
स्पर्शाने होतो रे तुझा संचार
तुझ्यामुळे सगळे उद्योगधंदे पडले ठप्प
तुझ्यामुळे आम्हाला घरी बसावे लागते गप्प
हातमजुर, कामगार यांची कधी मिटेल रे भुक
तुच सांग यात काय आहे आमची चुक
तु बनून आला आहे आमच्यासाठी काल
बस झाले रे आता किती बघशील आमचे हाल
तुझ्यामुळे महामंदीची लाट पसरली
तुझ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था घसरली
बस झाले रे आता आम्ही नाही करणार सहन
रावणासारखे आता आम्ही तुझेही करणार दहन
या कोरोनाला आता थांबवायचे आहे
सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करायचे आहे
घरी राहणे, हात धुणे हे नियम आता पाळावे
गर्दी, गोंधळात जाणे सगळ्यांनी टाळावे
कोरोनाला आता आम्ही हरवणार
पूर्वीसारखा एक नवा भारत आम्ही घडवणार
कवित्री : भामरे भाग्यश्री शांताराम
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-60/ […]