कवी – तुषार दौलत भांड
कोकीळाची कुहूकुहू ही कानावर पडती
मंजुळ आवाजांची
ही स्वप्नांची गाणी
मनात काहूरांची
ही आली भरती
झाली सुरुवात नव्या दिनाची.........
पक्ष्यांच्या सुरातून निघती ही गाणी
सूर्याच्या आगमनाची
रात्रीच्या निरोपाची
झाली सुरुवात नव्या दिनाची........
न्हाऊन थाटात ही हिरवी गालीचे सजली
दव मोतींची अलंकार अर्पण ही केली
मंद वाऱ्यांची चढली ही धुंदी
डोलू लागली ही हिरवी झाडी
झाली सुरुवात नव्या दिनाची........
फुलांची कळी उमलली
सुगंधाची लहर पसरली
आगमन या दिवसाचे करण्यासाठी
पारिजातकाने रांगोळी घातली
झाली सुरुवात नव्या दिनाची...........
नाव :- तुषार दौलत भांड
इयत्ता:- 11वी
मु.पो.:- आरडगांव, ता-राहूरी , जिल्हा-अहमदनगर
खुप सुंदर प्रकारे “नव्या दिवसाच्या सुरुवातीचे” वर्णन केलेले आहे.
खूप सुंदर
Good
Good
Beautiful
सोप्या शब्दांत खूप छान असे वर्णन केले आहे.
Nice
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-56/ […]