Marathi Kavita – Manatala Paus – मनातला पाऊस
कवयित्री – आरती योगेश ढोरे
मन म्हणजेच पाऊस आणि पाऊस म्हणजेच मन कधी शांत कधी वादळी तर कधी नुसताच भ्रम दाटून येतो काळोख ओथम्बती नभ जसा दाटतो कंठ मनी दुःखाचे मळभ भरून येते आभाळ मग सरी वर सर ऊर भरून वाहतात जसे डोळे झरझर पावसाशी उन्हाचा सुरु होतो खेळ मनाचा मनाशीच नाही ताळ मेळ कधी अतीव आनंद कधी उगाचच हुरहूर कधी येते सुंदरता न कधी नाहीच लागत सूर कधी अनामिक ओढ कधी आठवण मातीचा सुगंध आणि मायेची साठवण कधी कडाडते वीज धो-धो बरसती धारा जसा पेटून उठतो मनातील क्रोध सारा असा पावसाचा खेळ वेड्या मनाशीच चाले वेड्या पावसा सोबत मन वाऱ्यावर झुले वेड्या पावसा सोबत मन वाऱ्यावर झुले