Marathi Kavita – सांग देवा….आता तरी सांग

सांग देवा तूझा धर्म कोणता….
तूझी जात कोणती..
तूझा रंग कोणता….
तूझा झेंडा कोणता…
कारण देवा आता आम्ही माणसाकडे बघण्याच्या आधी त्यांच्या कपाळावरील रंगाकडे बघतो…. त्यांच्या आधी त्यांच्या डोक्यावरील झेंड्याकडे बघतो…..
अरे! त्यांचं सोड तुझ्याकडे पाहताना देखील आम्ही तुझ्या आधी तू पांघरलेल्या चादरीकडे बघतो…. तुझ्या आधी तुझ्या प्रार्थणेत आमचा धर्म कुठे सापडतो का हे पाहतो…
तूला माणसात शोधण्या आधी दगडातल्या देवाला शोधतो….
जरी आम्ही तूझीच लेकरे असलो तरी तूला नतमस्तक होण्या आधी तू आमचाच आहेस का हे पाहायला आम्ही कधी विसरत नाही…..
खरे तर आम्ही एवढेच पाहत असतो की…
तूझ्या झेंड्याशी……तूझ्या रंगाशी..आमच्या रक्ताचा रंग जुळतो की नाही….
सांग देवा आता तरी सांग तूझा रंग कोणता…. तुझ्या रक्तचा रंग कोणता…
Auto Amazon Links: No products found.








