पुनर्जन्मातलं प्रेम

0
1042
पुनर्जन्मातलं प्रेमः
मैथीलीचा आज १८वा वाढदिवस आहे,सकाळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं एक अनामिक पत्र आलं होतं.तीने आईशी यावर चर्चा केली तेव्हा तिची आई तिला म्हणाली बाळा तुझ्या दरवाढदिवशी असलं शुभेच्छा पत्र येत असतं ते कोण पाठवतं? कोठुन येतं? काहीच माहीती नाही बेटा..,.तिला थोडं विचित्र वाटलं पण तिने जास्त विचार नाही केला।बाबांनी आज तिला मोबाईल गिफ्ट केला होता त्यामुळे ती खुप खुश होती……
love-inspirational-daily
love-inspirational-daily

आज तिला एक sms आला .त्यात लिहीलं होतं I LOVE YOU.ते तिनं वाचलं,तिला वाटलं आपल्या कोणीतरी फ्रेंडने मस्करी केली असेल पण विचार केल्यावर तिला थोडा धक्काच बसला कारण तिने अजुन कोणालाही तिचा MOB NO दिला नव्हता….पण तिने त्याकडेही दुर्लक्ष केलं….तिला असे SMS वारंवार येऊ लागले होते,पण कोणीतरी आपली मस्करी करतंय म्हणुन ती अशा गोष्टींकडे जातीने दुर्लक्ष करत होती.
काही महीन्यानंतर कॉलेज पिकनिकला ती गेली.पिकनिकचे ठिकाण पावसाळी होते.

त्यावेळी पाऊस पडत होता ती झाडाखाली थांबुन पाऊस जाण्याची वाट पाहात एकटीच उभी होती,तिचा मोबाईल वाजला त्यावर एक SMS आला होता त्याच अनामिक नंबरावरुन,तो SMS आला होता,मैथिली या झाडाखालुन लवकर निघ,हे झाड पडणार आहे,असा तो sms होता,

तिला वाटलं कि याला कसं माहीत मी झाडाखाली उभी आहे.तिला वाटलं पिकनिला आलेल्या मित्रांपैकीच कोणीतरी हे SMS करतंय,म्हणुन तिनं दुर्लक्ष केलं।

तिला पुन्हा sms आला,कृपा करुन स्वतःसाठी नाही पण माझ्यासाठी स्वतःवर दया कर आणि आणि इथुन लवकर निघ हे झाड आत्ताच पडेल plz मैथिली।आता याला धडा शिकवायचा म्हणुन तिही तिथेच थांबली।आणि थोड्याच वेळात पावसाच्या पाण्याने त्या झाडाची मुळे खिळखिळी होऊन ते झाड पडलं,अन तेही तिच्या अंगावर.

ती कशीबशी त्यातुन उठली, तर समोर एक तरुण उभा होता।तु,तु कोण? मी,मी तुझ्या गतजन्माचा प्रेमी…हे कसं शक्य आहे?….कितीही विचित्र वाटत असलं तरी हेच खरंय.ते ग्रिटीँग्झ ते SMS मीच तर तुला पाठवत होतो।आपण मागच्याजन्मी एकमेकांवर खुप प्रेम करायचो,पण घरच्यांनी केलेल्या विरोधामुळेच आपण आत्महत्या केली,

पण मी त्यातुन वाचलो,माझा जीव कोणीतरी वाचवला होता,मी दुसर्यांदा जीव दिला त्यात यशस्वीपण झालो गं,पण तु तोपर्यंत कुठेतरी दुर गेली होतीस….गेलं एक युग मी तुझी वाट पाहतोय.तुझा पुनःर्जन्म झाला होता.

मी तुला शोधलं होतं याचा मला आनंद झाला.मी कायम तुझ्यासोबत असुनही मला तुझ्याशी बोलण्याचि शक्ती नियतीने मला कधीच दिली नाही..कधीच दिली नाही……त्याची ही कहाणी ऐकुन ती स्तब्ध झाली होती,आता तिला कळलं होतं की हा त्याचा आत्मा आहे.

पण तरीही त्याच्यावर खुप प्रेम करु लागली होती.खुपच प्रेम….तीःमग मला तुझी व्हायची झाल्यास काय करावं लागेल?

तोःआत्महत्या…ते ऐकताच तीने लगेच समोरुन जाणार्या ट्रकच्या खाली उडी घेतली….तो ट्रक तिच्या अंगावरुन गेला पण तिला काहीच झालं नाही ती उठली आणि त्याला म्हणाली मी मरत का नाहीये?….अगं तु तर आधीच ते झाड अंगावर पडुन मेली आहेस……मी माझ्या निस्वार्थ प्रेमापोटी तुला SMS करुन तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्नही केला,पण तु ऐकलंच नाहीस माझं,ते बघ तुझं ते मृत शरीर….ते बघुन तीने एकदम त्याला मिठीच मारली….किती प्रेम करतोस रे माझ्यावर मला इथुन दुर घेऊन चल…..

तो तिला दुर घेऊन गेलाय आज…..खुपच दूर जिथे ते फक्त दोघेच आहेत एका प्रेम दुनियेत…
मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच की,प्रेम करा पण त्यामध्ये निस्वार्थीपणा असावा.

तुमच्या प्रेमापोटी तुमच्या जोडीदाराचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्या……!!!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here