Marathi Kavita – असं एकतरी नातं असावं…
मनसोक्त आपल्याशी बोलणारं
आपलही तितकच ऐकणारं
मनातील भावं जाणणारं
असं एकतरी नातं असावं…
सुखात सोबत हसणारं
दु:खात अश्रू पुसणारं
सुखदु:खाचे खेळ साथ खेळणारं
असं एकतरी नातं असावं…
यशात पाठ थोपटणारं
अपयशात मनोबल वाढवणारं
हरेक चढ-उतारात साथ चालणारं
असं एकतरी नातं असावं…
नात्याचे बंध जपणारं
निस्वार्थ निर्मळ असणारं
औपचारिकतेचा दिखावा नसणारं
असं एकतरी नातं असावं…
– मिलिंद डोंबाळे (देशमुख)