Marathi Actress Sai Tamhankar – सई ताम्हणकर
नाव: Sai Tamhankar(सई ताम्हणकर)
जन्मदिनांक : २५ जून, १९८६
नवरा : अमेय गोसावी
शहर : सांगली, महाराष्ट्र
सई ताम्हणकर, कॉलेज मध्ये असताना सई ने पहिल्यांदा नाटकात काम केले, तेव्हा पासून सईचा अॅक्टिंग कडील कल वाढला, त्यांनंतर सई ने इंटर कॉलेज स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली, तिच्या ‘आधे आधुरे’ नाटकात केलेल्या भूमिके पदधल सई ला पुरस्कार मिळाला, या नंतर मात्र सई ने याच क्षेत्रात पुढील करियर करण्याचा निर्णय घेतला.
सई ने सर्वप्रथम या गोजिरवाण्या घरात या सुप्रसिद्ध मराठी मालिकेत महत्वाची भूमिका साकारली, तिच्या या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले, आणि या नंतर सई कडे अनेक मराठी मालिकांच्या ऑफर आल्या. सई ने अग्निशिखा, साथी रे, कस्तुरी या मालिकांमध्ये भूमिका केल्या.
याच वेळी सई ला सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाइट या सिनेमाची ऑफर आली, आणि सई ने ती स्वीकारली सुद्धा. सई चे मराठी चित्रपटात पदार्पण झाले ते सनई चौघडे या चित्रपटा मधून, हा चित्रपट खूप गाजला.
या नंतर सई ने अमीरखान च्या गजनी या चित्रपटा मध्ये महत्वाची भूमिका केली.
नो एंट्री या मराठी चित्रपटातून सई ही मराठी चित्रपटातील पहिली बिकनी गर्ल म्हणून पुढे आली .
नुकतेच सई आणि अमेय गोसावी यांचे लग्न झाले.
चित्रपट
- टाइम प्लीज (लवकरच)
- दुनियादारी (लवकरच)
- अनुमति
- बालक पालक
- झपाटलेला २
- अशाच एका बेटावर
- धागेदोरे
- बाबुराव ला पकडा
- आघोर
- नो एंट्री पुढे धोका आहे
- पुणे ५२
- दोन घडीचा डाव
- राडा रॉक्स
- झकास
- मिशन पॉसिबल
- अजब लग्नाची गजब गोष्ट
- लालबाग परेल
- रिटा
- बे दुणे साडे चार
- हाय काय नाय काय
- पिकनिक
- सनई चौघडे
हिन्दी चित्रपट
- विल्ला
- गजनी
- ब्लॅक अँड व्हाइट
मराठी मालिका
- या गोजिरवाण्या घरात
- अग्नि शिखा
- साथी रे
Hi sai you are my favorite actress in marathi film industry.. I like your real and natural acting.. Love you and best luck for your future