Guru Thakur :- यल्गार

2
10388
Guru Thakur
Guru Thakur

“यल्गार” 

“नशिबास कर हवे तेवढे वार” म्हणालो ..
“मानणार ना तरी कधी मी हार” म्हणालो ..


केला सौदा संकटासवे आणि व्यथेला..
“खुशाल यावे उघडे आहे दार” म्हणालो..


खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला “तैयार” म्हणालो..


रिचवून सारे तुडुंब प्याले अपमानाचे..
दगा बाज दुखालाही “आभार” म्हणालो  ..


कुबेर आला दारी म्हणाला “माग हवे ते”
हसून त्याला “केवळ खांदे चार” म्हणालो..


रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला..
राखेतुनही उठलो अन “यल्गार” म्हणालो..

[tube]akVM1N8KXTU[/tube]

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here