Indian Navy career in IT – आयटीवीरांसाठी नौदलात संधी

0
3813

– आनंद मापुस्कर (maharashtratimes.com)

Indian Navy Career in IT


कम्प्युटर सायन्स , बीएसस्सी आयटी , बीसीए , एमसीए अशा कम्प्युटर्समधल्या पदव्या घेतल्या म्हणजे फक्त आयटी क्षेत्रात करिअर करायचं असं नव्हे. या कम्प्युटरवीरांना आता ख-या अर्थाने देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. कारण नौदलात जाण्यासाठीही अनेक नवनव्या नोक-या त्यांची वाट पाहतायत.

आधुनिक काळात सैन्यदलांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा शस्त्र म्हणून वापर होऊ लागलाय. आपल्या सैन्यदलाच्या सज्जतेची , तंत्रज्ञानाची तसंच रणनीतीची माहिती अन्य राष्ट्रांना कळू नये यासाठी दक्षता घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटरायझेशन अत्यावश्यक झालंय , नौदलही त्याला अपवाद नाही. आपल्याकडची गुप्त माहिती शत्रुराष्ट्रांना मिळू नये यासाठी भारतीय नौदलाने एक्झिक्युटिव्ह ब्रँचअंतर्गत ‘ माहिती तंत्रज्ञान ‘ हा विभाग स्थापन केलाय. अविवाहित पुरुष उमेदवारांना त्यात प्रवेश दिला जाईल. या विभागांतर्गत प्रशिक्षणानंतर भारतीय नौदलाच्या जहाजांवर तसंच इतर कार्यालयांमध्ये नेमणूक केली जाते. निवड झालेल्या अधिकाऱ्यांना ‘ओपन सोअर्स अॅप्लिकेशन ‘ व ‘ प्रोप्रायटरी टेलर मेड सॉफ्टवेअर ‘ मध्ये काम करण्याची संधी मिळेल. भारतीय नौदलात काम करताना संगणकातील अद्ययावत प्रणालीवर काम करता येईल. उदा. युनिफाईड डोमेन , शेअर पॉईंट , सॅप वगैरे. नौदलासाठी सुरक्षित व महत्त्वपूर्ण कम्प्युटर नेटवर्किंग करणं याचाही समावेश या कामात होईल. नौदलाची सॉफ्टवेअर्स , नेटवर्क , पोर्टलची देखभाल करण्याचं काम या अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे.

शैक्षणिक पात्रता

बी.ई./बी.टेक.(कम्प्युटर सायन्स/ कम्प्युटर इंजिनीयरिंग/आय.टी.)
बी.एस्सी.(आय.टी.)
एम.टेक.( कम्प्युटर सायन्स)
एम.एस्सी.( कम्प्युटर)
बी.सी.ए./एम.सी.ए.

वयोमर्यादा –

१९ १/२ वर्षे ते
२५ वर्षे

प्रमोशन –

सुरुवातीला सब-लेफ्टनंट व नंतर लेफ्टनंट , लेफ्ट. कमांडर , कमांडर अशा प्रमोशनच्या संधी मिळतात.

वेतन-

सब-लेफ्टनंटचं सुरुवातीचं वेतन दरमहा. रु.६६ , ५००/- इतकं असतं.

शॉर्ट सर्व्हिस

कमिशनअंतर्गत १० वर्षं नोकरी करता येते. त्यानंतर दोन वर्षांची दोन एक्सटेन्शन मिळू शकतात.

निवड प्रक्रिया –

पदवी परीक्षेतील मार्कांनुसार विद्यार्थ्यांना एसएसबी(सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड) इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. एसएसबी(सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड) इंटरव्ह्यूची विभागणी दोन टप्प्यात केलेली आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत इंटेलिजन्स टेस्ट , पिक्चर पर्सेपशन व डिस्कशन टेस्टचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेला सामोरे जावे लागेल. या टप्प्यामध्ये सायकॉलॉजिकल टेस्ट , ग्रुप टेस्ट व मुलाखत असेल. यातील यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची सब-लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली जाईल.
तसंच नेव्हल अॅकॅडमी इझीमाला , केरळ इथे २२ आठवडयाचं प्रशिक्षणही दिलं जाईल.

प्रवेश अर्ज –

२२ जुलैपर्यंत ऑनलाईन भरायचे आहेत. ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिंटआऊट घेऊन ती पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे.
अधिक माहितीकरीता www.nausena-bharti.nic.in ही वेबसाइट पहावी.

 

ENGLISH

The Navy is preparing its own brigade of trained cyber hackers in the Indian Naval Academy at Ezhimala, Kerala, to stand up to the Chinese cyber attackers and launch a counter attack to fish out information from their computers. Taking into account the new threat environment, the Navy has decided to have a dedicated Information Technology (IT) force to manage its entire network.

The first batch of the IT cadre will commence its training in December this year at the Naval Academy in Ezhimala. The officers will be absorbed into the force under the executive branch as Short Service Commission officers, Navy officials told Express. The force has already given out an advertisement calling in applications from qualified people. “This IT force of the Navy would be deployed on board warships and various sensitive establishments to manage and secure the network in the organisation,” the officials added.

The IT brigade will be deft in handling state-of-the-art networks and niche applications both in operational and administrative areas. They would also take care of open source applications and proprietary tailormade software. Moreover, the IT cadre profile would involve designing and implanting secure and critical networks including manning of security operation and network operation centres in a domain of cutting edge technologies while maintaining various Navywide applications and portals.

The announcement of the IT cadre by the Navy has come at time when cyber attacks have increased manifold on military networks from various quarters, especially from China.

More recently, the Navy’s Eastern Naval Command was the victim of the attack and it could not be ascertained how much sensitive information was lost in the attack, which involved a computer bug that clandestinely infiltrated the naval computers and then transmitted the data back to Chinese computers.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here