Egg Biryani – अंड्याची मसाला बिर्याणी
By Manidipa
बिर्याणी ही माझ्या घरातील सर्वात प्रिय अशी डिश, मी काही वर्ष दक्षिण भारता होते तिथेच मला बिर्याणीची खरी चव समजली..
त्यानंतर मी बिर्याणी या प्रकारात अनेक प्रयोग केले.
आपण सर्वांनी चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी किंवा वेज बिर्याणी ऐकली असेल, पण आज मी तुम्हाला सर्वात सोपी अशी अन्द्यची बिर्याणी बनवायला शिकवणार आहे.
तर ही सुंदर पाककृती आपण पाहूया..
काय काय लागते?
सामानाचे प्रमाण ३-५ जणांसाठी
घटकपदार्थ:
२०० ग्र. बास्मती तांदूळ
१ मोठा बारीक कापलेला कांदा
१ बारीक कापलेले टोम्याटो
१ बटाटा बारीक चौकोनी कापलेला
अर्धी बारीक कापलेली भोपाली मिरची
४ उकळलेली अंडी
१ बारीक कापलेली हिरवी मिरची
१ चमचा गरम मसाला
अर्धा चमचा आल्याची पेस्ट
अर्धा चमचा जिरे पावडर
१ चमचा हळद
अर्धा चमचा लाल मिरची पावडर
अर्धा चमचा धने पावडर
२ चमचे तूप
१ चमचा तेल
थोडीशी साखर
चवी पुरते मीठ
अंड्याची बिर्याणी कशी बनवायची?
सर्वप्रथम बास्मती तांदूळ नित धुवावा आणि टो २०-३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा.
याने बास्मती तांदुळाचा आकार वाढतो, आणि जेव्हा त्याला उकळतो तेव्हा टो सर्वाधिक आकार मिळवतो..
यानंतर उकलेल्या अंड्यांना काही ठिकाणी त्याच्या पांढर्या भागावर कापायचे..
त्यामध्ये हळद आणि मीठ टाकावे. आणि अंडे तळावे..व टाळून झाल्यावर बाजूला ठेवावे.
यानंतर प्यान मध्ये तेल टाकून ते गरम करावे.
त्यात कापलेला कांदा आणि मिरची टाकून त्याचा रंग तपकिरी होई पर्यंत तळावे.
यानंतर त्यात कापलेले टोम्याटो, भोपाली मिरची, आणि बटाटा टाकावा,
आणि मध्यम उष्णतेवर आणखी २-३ मिनिट मिश्रणाला तळावे..
नंतर यात सर्व मसाले आणि मीठ टाकावे आणि उत्तम प्रकारे त्याचे मिश्रण करावे..
नंतर धुतलेला बास्मती तांदूळ पण मध्ये टाकावा.. त्याबरोबर थोडे मीठ आणि साखर पण टाकावे..
तांदूळ आणि सर्व मसाले व्यवस्तीत एकत्र करावेत.. मिश्रणात तूप देखील टाकावे..
शेवटी मिश्रणामध्ये आधी तयार केलेली अंडी टाकावीत.. पुरेसे पाणी टाकून प्यान वर झाकण ठेवावे..
२० मिनिटांसाठी त्याला शिजू द्यावे..
तांदूळ जर व्यवस्तीत शिजला असेल तर बिर्याणी व्यवस्तीत एकत्र करून ..कांदा आणि रायत्या सोबत जेवणास वाढावी..
दमबिर्याणी प्रमाणे यावर पुदिनाची पाने व कोठीबिरची पाने ठेवू शकता…
By Manidipa
Get more recipes from http://manidipa-kitchen.blogspot.in