Blog Comments For SEO – ब्लॉग वरील प्रतिक्रिया

1
1688

Blog Comments For SEO – ब्लॉग वरील प्रतिक्रिया

अनेक मराठी ब्लॉगर्स खूप छान ब्लॉग लिहितात, पण प्रत्येकाला त्याचा ब्लॉग हा जास्तीत जास्त मराठी वाचकांनी वाचवा असे वाटत असते. या विषयी आपण कधी internet वर माहिती शोधली असेल तर आपल्याला SEO म्हणजेच SEARCH ENGINE OPTIMIZATION च्या अनेक टिप्स मिळतील.

आज मी तुम्हाला तुमच्या ब्लॉग च्या SEO साठी ब्लॉग वरील Comments म्हणजेच प्रतिक्रिया किती महत्वाच्या आहेत या विषयी सांगणार आहे.

Blog-Comments

सर्वप्रथम आपण मराठी भाषेत ब्लॉग लिहीत असल्याने, आपला ब्लॉग इतर इंग्लिश  भाषेतील ब्लॉग च्या तुलनेत SEARCH RANKING मध्ये थोडा मागे राहतो. याला अनेक जण भाषा कारणीभूत आहे असा निष्कर्ष काढतात. पण या मागे अनेक करणे आहेत.  आपण जरी मराठी भाषेत ब्लॉग लिहीत असलो तरी ब्लॉग लीहिताना थोड्या तांत्रिक गोष्टी सांभाळल्या तर आपला ब्लॉग इंग्लिशभाषेपेक्षाही जास्त चांगला RANK SEARCH मध्ये मिळवू शकतो.

आज अश्याच अनेक SEO tips पैकी मराठी ब्लॉगर्ससाठी असलेल्या एका महत्वाच्या टिप्स विषयी …

ब्लॉग Comments/प्रतिक्रिया

आपल्या ब्लॉगवर येणार्‍या Comments/प्रतिक्रिया या ब्लॉग च्या SEARCH Ranking मध्ये महत्वाच्या असतात.

1. ब्लॉगवर येणारी प्रतिक्रिया हे सूचित करतात की तुमचा ब्लॉग इतर वाचक पूर्ण वाचतात आणि मत प्रदर्शित करतात. अश्या प्रतिक्रियांना आपण उत्तरे देऊन वाचकांबरोबर एक प्रकारे संवाद साधू शकता. खरे बघितले तर ब्लॉग आणि वर्तमानपत्रातील लेख या मध्ये हाच मोठा फरक आहे. ब्लॉगवर आपल्याला वाचकांच्या प्रतिक्रिया लगेच मिळतात आपण त्यांना लगेच उत्तरे देऊ शकतो. या संवादामुळे वाचक आपल्या ब्लॉग बरोबर कायमचे जोडले जातात.

2. आपण ब्लॉग वरील Comments साठी कोणते Module किंवा Pluggin वापरता हेही तेवढेच महत्वाचे.  उदा. ब्लॉग वर असलेली सुविधा(Blogspot/Wordpress) किंवा Facebook Comments किंवा Google Plus Comments.

फेसबुक किंवा गूगल प्लस यावरील Comments चा फायदा म्हणजे त्यांच्या Comments या त्यांच्या फेसबुक किंवा गूगल प्लसवर प्रकाशित होतात. यामुळे त्यांचे मित्र देखील आपला ब्लॉग पाहू शकतात.

फक्त फेसबूक किंवा गूगल प्लस किंवा Discus अश्या Comments Module वापरण्याआधी आपला ब्लॉग किती जुना आहे? यावर आधी किती Comments आहेत . यांचा विचार करणे महत्वाचे आहे. अचानक आपल्या ब्लॉग वरील सर्व जुन्या Comments काढून टाकल्या तरी आपले BLOG VISITORS कमी होऊ शकतात.

3. ब्लॉगवरील प्रतिक्रिया देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात जेवढा तुमच्या ब्लॉग चा Content. कारण तुमच्या ब्लॉग वरील प्रतिक्रिया देखील Google Spider वाचतात.

4. आपल्या ब्लॉग मधील Comments मध्ये अनेकदा प्रश्न उत्तरे असतात , या मुळे जे KEYWORDS जास्तीत जास्त SEARCH केले जातात ते Comments मध्ये असतात. यामुळे आपल्या ब्लॉग च्या SEARCH Ranking वर फरक पडतो.

5. ब्लॉग वरील Comments मधून जे वाचक जोडले जातात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे इतर वाचक देतात, त्यांच्यात एक Community तयार होते, हा ग्रुप खूप महतवाचा असतो, यातुन आपला ब्लॉग हा आपल्या नकळत एक SOCIAL NETWORKING संकेतस्थळ बनतो.

6.  GOOGLE SEARCH च्या अल्गोमध्ये ब्लॉगपोस्ट वर किती Comments आहेत हे देखील पाहिले जाते. तुम्ही सुद्धा तपासून पाहू शकता, तुमच्या ज्या ब्लॉग पोस्ट वर जास्त Comments असतील त्याला जास्त वाचक असतील. ते याच कारणामुळे .

आत्ता पर्यन्त आपण पहिले की आपल्या ब्लॉग वरील Comments/प्रतिक्रिया किती महत्वाच्या आहेत ते.

पुढील लेखात जास्तीत जास्त Comments किंवा प्रतिक्रिया कश्या मिळवायच्या या विषयी पाहूया. तसेच SEO For Marathi Blogs, Best WordPress Pluggins For Marathi Blogs अश्या अनेक विषयांसाठी SUBSCRIBE करा.

मराठी ब्लॉग्स विषयी अधिक माहितीसाठी भेट द्या. MARATHI BLOGS

कोणताही प्रश्न मनात असेल तर Comment करा…. कारण Comments महत्वाच्या आहेत ,,, 🙂

MARATHI Bloggers साठी लवकरच एक Forum सुरू करत आहे..

Register your Marathi Blog On MarathiBlogs.in and get More Marathi visitors…. Its FREE.

1 COMMENT

  1. या वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद . तो खरोखर उपयुक्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here