Blogspot vs WordPress – ब्लॉगस्पॉट की वर्डप्रेस

1
1633

नमस्कार मित्रांनो,

आजपासून मराठी ब्लॉगर्ससाठी हे नवीन सदर सुरू करत आहे. मराठी ब्लॉगर्स ना सर्व तांत्रिक मदत पुरवणे हे एकमेव उद्दीष्ट.

अनेक मराठी लेखकांना , उत्कृष्ट लेखन करता येते, पण ब्लॉग बनवायला लागणारे तांत्रिक कौशल्या मध्ये ते मागे पडतात. जसे उत्कृष्ट लेखन महत्वाचे असते तेवढेच ते लेखन वाचकांपर्यन्त पोहचणे तेवढेच महत्वाचे असते.

ब्लॉग बनवताना सर्वात पहिला प्रश्न येतो …  ब्लॉग कोणत्या CMS मध्ये बनवायचा. (CMS – CONTENT MANAGEMENT SYSTEM) . ब्लॉगस्पॉट की वर्डप्रेस.

याहून मोठा प्रश्न ब्लॉग सेल्फ होस्टेड करायचा की नाही?

आता सेल्फ होस्टेड म्हणजे काय … जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगला ABC.COM असे स्वतचे नाव हवे असेल तर तो सेल्फ होस्टेड.

किंवा तुम्ही ABC.blogspot.com किंवा ABC.wordpress.com असे फ्री नाव पण वापरू शकता.

आता प्रश्न उरतो सेल्फहोस्टेडसाठी काय करायचे आणि कसे?

सेल्फ होस्टिंग साठी 2 महत्वाच्या गोष्टी ..  १. डोमेन नेम (संकेतस्थळाचे नाव) – ABC.com – खर्च जास्तीत जास्त ६५० रु. (वार्षिक)

२. होस्टिंग (संकेतस्थळाची ऑनलाइन जागा ) – खर्च जास्तीत जास्त २५००रु. (वार्षिक)

डोमेन किंवा होस्टिंग विकत घेण्यासाठी     येथे क्लिक करा  किंवा सर्वात स्वस्त मराठीबोली.इन ची संपूर्ण सेवा फक्त ११०० रुपयात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

आता जर तुम्हाला तुमचा ब्लॉग मोफत सुरू करायचा असेल तर २ पर्याय आहेत..

१. ब्लॉगस्पॉट.कॉम

२. वर्डप्रेस.कॉम

वर्डप्रेस की ब्लॉगस्पॉट

blogspot-vs-wordpress

१. स्वतच्या ब्लॉगवर कंट्रोल.

ब्लॉगस्पॉट हे गुगलचे प्रॉडक्ट आहे, जेवढे ते स्टेबल आहे तेवढेच धोकादायक , कारण ब्लॉग जरी तुमचं स्वतचा असला तरी तुमची त्यावर मालकी नसेल, तुमचा ब्लॉग गुगल कोणतेही कारण न देता कधीही BAN करू शकतो. जर काही SPAMMERS नि तुमच्या ब्लॉगला स्पॅम म्हणून रीपोर्ट केले तर तुमचा ब्लॉग गुगल बंद करू शकतो आणि असे घडलेले आहे आपण यासाठी गुगलवर सर्च करू शकता.

वर्डप्रेस च्या बाबतीत हा धोका कमी आहे. जर आपण वर्डप्रेसचा सेल्फहोस्टेड CMS वापरली तर हा धोका अजिबातच नाही. (WORDPRESS.ORG)

२. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन (SEARCH ENGINE OPTIMIZATION)

तुम्ही ब्लॉग कितीही चांगला लिहा , महत्वाचे असते ते वाचकांनी तो वाचणे . यासाठी आपला ब्लॉग सर्च इंजिन फ्रेंडली असणे महत्वाचे आहे. म्हणजेच वाचकांना आपला ब्लॉग गूगल बिंग अश्या सर्च मधे सापडायला हवा .

या बाबतीत वर्डप्रेस ब्लॉगस्पॉट पेक्षा वरचढ ठरते.

३. प्लगीन्स / मोडूल्स

वर्डप्रेस मधे ब्लॉगस्पॉट पेक्षा अधिक प्लगीन्स आहेत. वर्डप्रेस वरील अनेक प्लगीन्स मोफत उपलब्ध आहेत. तर वर्डप्रेस ही मोठी COMMUNITY असल्याने आपल्या अडचणीची उत्तरे इथे लगेच मिळतात.

४. थीम / टेम्पलेट

वर्डप्रेस हे सॉफ्टवेअर ब्लॉग तसेच संकेतस्थळ बनवण्यासाठी वापरण्यात येते, त्यामुळे येथे अनेक मोफत थीम उपलब्ध आहेत , वर्डप्रेस वर आपण स्वताचे ऑनलाइन शॉप सुद्धा अगदी सहज बनवू शकतो. इथेही वर्डप्रेस ब्लॉगस्पॉट पेक्षा वरचढ ठरते.

५. अॅडसेन्स

ब्लॉग मधून उत्पन्न मिळवण्याचा सर्वात प्रसिद्ध मार्ग म्हणजे GOOGLE ADSENSE. हे गुगलचे चे प्रॉडक्ट असल्याने सुरूवातीला ब्लॉगस्पॉट वापरणार्‍या ब्लॉगर्स चे ब्लॉग लवकर अडसेन्स साठी पात्र ठरायचे. मात्र आता हे फार कठीण झाले आहे. त्या पेक्षा सेल्फ होस्टेड ब्लॉग लवकर पात्र ठरतात.

गूगल अॅडसेन्स विषयी अधिक माहितीसाठी पुढील पोस्ट पहा.

अॅडसेन्स भाग १.

अॅडसेन्स भाग २.

गुगल साठी ब्लॉगस्पॉट हे एक फक्त प्रॉडक्ट आहे, गुगलचा अत्ता पर्यंतचा इतिहास बघितला तर गूगल रीड किंवा ऑर्कूट अशी तोटया मधील सॉफ्टवेर्स गुगलनी बंद केली आहेत. त्यामुळे ब्लॉगस्पॉट सुद्धा बंद करण्याचा निर्णय गुगल घेऊ शकते. अश्यावेळी आपला ब्लॉग हलवणे आणि ते सुद्धा तुमच्या ब्लॉगच्या  नियमित वाचकांसह खूप कठीण जाईल..

म्हणूनच माझ्यामते , जर आपण मनापासून ब्लॉग लिहाणार असाल तर थोडा खर्च करायला काहीच हरकत नाही.. तुम्ही तुमचा स्वताचा ब्लॉग सुरू करू शकता जास्तीत जास्त (३००० रु.) वार्षिक किंवा जर हा खर्च आपल्यास जास्त वाटत असेल तर आमच्या मदतीने फक्त ११०० रुपयांमद्धे आपण ब्लॉग बनवू शकता. तेही सर्व मोफत तांत्रिक मदती सह.. मराठीबोलीच्या मदतीने ब्लॉग बनवण्यासाठी येथे क्लिक करा….

If you want to Publish your Marathi Blog on MarathiBlogs.in Click here.

MarathiBlogs.in is Marathi Blog Directory only for Marathi Blogs.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here