Nava Gadi Nav Rajya – नवा गाडी नव राज्य
विनोदी प्रेमकथांवर आधारित नाटके काही कमी नाहीत…अश्या खुप प्रेमकथा आहेत ज्यांचा सुखकर शेवट अखेर लग्नात होतो..
पण लग्नानंतर सुरु होणारी प्रेमकथा बघायची असेल तर एकदा जरूर पहा…
एकदंत क्रिअशन निर्मित नव्या टीमची नव्या दमाची प्रेम कथा “नवा गडी नव राज्य”..
अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या या नाटकाने अगदी अल्पावधीत १२५ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे..
लग्नानंतर नुकतेच चार महिने झालेल्या एका जोडप्याची ही कथा…. या कथेत आणखी दोन गडी सामील होतात आणि सुरु होते ही विनोदी प्रेमकथा..
ही प्रेमकथा लिहिली आहे लेखक क्षितीज पटवर्धन यांनी..तर याचे दिग्दर्शन केले आहे समीर विध्वंस यांनी…
यात हेमंत ढोमे, प्राजक्ता दातार, प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत..
“हम तो तेरे आशिक है”, “खेळी मेळी”, “ए भाऊ डोके नको खाऊ” अशी उत्तम व्यावसायिक नाटके देणाऱ्या एकदंत क्रिअशन चे हे नवे नाटक रसिकांना हसवण्यात यशस्वी झाले आहे..
तरी नक्की पहा …. नवा गडी नव राज्य …