कवयित्री – भक्ती संतोष
संपर्क – bhaktisantosh99@gmail.com
गाव मैत्रीच – Marathi Kavita Gav Maitrich
एक गाव मैत्रीचं
रहिवासी तिथे चार,
पाहुण्यांची नेहमीच रेलचेल
पण कायम राहण्यास नकार..
चार मधलं एक घर
प्रेरणास्थान आमचं,
सतत त्यांचं मार्गदर्शन मिळावं
याकडेच आमचं लक्ष..
एक घर मात्र
नेहमी खोड्या काढण्यात व्यस्त,
इतरांना कायम चिडवायचं
यातच ते मस्त..
तिसरं ते घर
स्तंभ त्या गावाचं,
प्रेमाचं, आपुलकीचं आणि
चिडचिडया मनाचं..
उरलं सुरलं घर शेवटचं
गोड गुलाबी रंगाचं,
सर्वांच्या आवडीनिवडी जपण्यात
सदैव गर्क असायचं..
नुकतंच एक घर अजून
बांधून पूर्णत्वास आलंय,
कायम राहण्यास ते आता
संपूर्ण तयार झालंय..