Record Break Timepass – एक वेगळी दुनिया , एक वेगळीच दुनियादारी
काल टाइमपासच्या पार्टीला दुनियादारीची टीम आली व त्यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या दुनियादारीने सर्वांची मने जिंकली. टाइमपासने दुनियादारीचा रेकॉर्ड मोडला म्हणून दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी मला त्यांच्या संकल्पनेतुन साकारलेला एक फिरता चषक दिला व अशी ईच्छा व्यक्त केली की भविष्यात जो टाइमपास चा रेकॉर्ड मोडेल त्याला मी तो चषक द्यावा !!!
हे केवळ मराठीतच होऊ शकते!!!
दुनियादारी टीमच्या ह्या अनोख्या दुनियादारीला टाइमपास टीम कडून मानाचा मुजरा !!!
रवी जाधव – दिग्दर्शक – टाइमपास