Marathi Movie Ekulati Ek Review – एकुलती एक चित्रपट परीक्षण

0
1132

Marathi Movie Ekulati Ek Review – एकुलती एक चित्रपट परीक्षण

marathi movie ekulati ek

निर्मिती : सुश्रीया चित्र
दिग्दर्शन: सचीन पिळगांवकर
कलाकार : श्रीया पिळगांवकर, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सिद्धार्थ मेनन, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे.
संगीत: जितेंद्र कुलकर्णी
संवाद: इरावती कर्णिक
प्रदर्शन दिनांक: २३ मे २०१३

marathi movie ekulati ek

सचिन पिळगांवकर यांनी २३ मे २०१३ रोजी आपल्या चित्रपट कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली, आणि त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच श्रीया पिळगांवकर यांचा पहिलाच चित्रपट ‘एकुलती एक ‘ प्रदर्शित केला.

एकुलती एक , ही कथा आहे स्वरा देशपांडे या घटस्पोटीत जोडप्याच्या एकुलत्या एक  मुलीची. स्वराने आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या आई वडिलांना कधीच एकत्र बघितलेले नाही, वयाच्या अठरा वर्षां पर्यन्त स्वरा ही तिच्या आई बरोबर नागपूरला राहत होती.

स्वराची आई ही आकाशवाणी केंद्रावर काम करते, तर वडील अरुण देशपांडे हे गायक आहेत. स्वराला अभिनेत्री हवायचे आहे. पण स्वराचे पहिले स्वप्न आहे तिला तिच्या वडिलांना भेटायचे आहे. हाच उद्देश समोर ठेऊन स्वरा मुंबईत येते.  आणि सुरू होते गोष्ट वडील आणि मुलीच्या भावनिक नात्याची.

marathi movie ekulati ek

चित्रपटाची गोष्ट संपूर्ण नवी नसली तरी ती नवीन भासते. संवाद तर उत्कृष्टच. चित्रपटाची तांत्रिक बाजू पण मजबूत, आणि सर्ब कलाकारांचा अभिनय देखील उत्तम, श्रीया पिळगांवकर हिचा हा पहिलाच चित्रपट, तरी सुद्धा चित्रपट बघताना असे कुठेच भासत नाही, संवाद नैसर्गिक भासतात. सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, किशोरी शहाणे, निर्मिती सावंत यांचा अभिनय तर उत्तमच .

चित्रपट हा खरा भासतो, कुठेच कसलाही खोटेपणा  किंवा भावनांचा ओवरढोस होत नाही. चित्रपटातील संवाद शहरी आहेत . चित्रपटाचे संगीत श्रवणीय, चित्रपटातील सोनू निगम यांनी गायलेले ‘कारे माया वेडी’ अगदीच भावनिक, चित्रपटाच्या प्रमो मध्ये सांगितल्या प्रमाणेच संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा चित्रपट.

चित्रपटाचा ट्रेलर

[tube]1NeFuM4ReC0[/tube]

marathi movie ekulati ek

marathi movie ekulati ek 6

marathi movie ekulati ek

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here