आमचा बॉस परप्रांतीयच…

10
3541

आमचा बॉस परप्रांतीयच…

swarajya
swarajya
एवढा विचार करू नका…हीच सत्य परिस्थिती आहे…
२ वर्षां पूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी परप्रांतीयान विरुद्ध आवाज उठवला…तेव्हा अनेक परप्रांतीयांवर हल्ले झाले..अनेक जण तर मुंबई सोडून गेले..आता परत आले असतील कदाचित..
असो.. पण याने काय साधले..काहीच नाही..
आजही मराठी माणूस म्हटले की…सरकारी नोकरीत ..अगदी समाधानी असलेला माणूस..असेच चित्र दिसते…कोणी बँके मध्ये तर कोणी पोस्टा मध्ये..
काही जाणे बीएमसी मध्ये तर काही एमएसइबी मध्ये..पोलीस दलात पण आहेत आमचे मराठी….
पण कुठेही असले तरी हा वर्ग नोकरशाहीवर्ग….
खूपच कमी..अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मराठी माणसे…या सर्व सरकारी नोकर्यांच्या सर्वोच्चस्थानी दिसतात…
महाराष्ट्रातल्या किती बँकांच्या सर्वोच्चस्थानी मराठी माणूस आहे..?
मुंबई पोलीस आयुक्त किती वेळा मराठी होते..?
पोस्टाच्या सर्वोच्चस्थानी किती वेळा मराठी माणूस होता..?
असो..
आता चित्र थोडेसे वेगळे आहे..
मराठी तरुण आता सरकारी नोकरीकडे वळत नाही… मराठी तरुण जातात आयटी क्षेत्राकडे..पण इथेही जास्त फरक नाही..
किती आयटी कंपन्यांचे मालक मराठी आहेत..??
जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा यांचा बॉस असतो उत्तर भारतीय..
दोन वर्षांनी यांना बढती मिळते..तेव्हा यांचा बॉस असतो .. गुजराती…
आणखी दोन वर्षांनी अजून एक बढती…आता बॉस आहे..दक्षिण भारतीय…
हे असेच चालू राहते…
मी प्रांतवादाच्या बाजूने मुळीच नाही…
पण आम्ही नेहमी अशीच गुलामगिरी का करायची…
कितीदिवस अजून दुसर्यांच्या हाताखाली काम करणार…
हे चित्र बदलायला हवे…
यासाठी परप्रांतीयांवर हल्ले करून काही होणार नाही…
आपल्यालाच बदलायला हवे…
अनेक वर्षांपूर्वी असेच चालायचे….सर्व मराठी रयत ही मुघलांच्या हाताखाली कामे करायची..
आणि त्यात ती सुखी पण होती…जसे आज आपण आहोत
पण एकाने आवाज उठवला…मुठभर सवंगड्याना घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले..
पुढे मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले…
हे काही फार कठीण नाही…गरज आहे ती फक्त एका ध्येयाची…
ते ध्येय तेव्हाही तेच होते….जे आत्ता आहे…स्वराज्य

10 COMMENTS

  1. Sagal barobar ahe… Pan ekhada manoos mag to kontyahi prantacha aso kinva aaplya prantacha aso, tya thikhani ka ahe he bghun aapan shikayla hav na… nusat hattala petun ekhadyala mage taknyachi irsha mhanun nako, manapasun ekhadi gosht awadlyashivay tyacha sarvocch sthani jata yet nahi…

    • Nakkich, aapan prayatn karayache te swata pudhe janyasathi… Dusaryala mage takanya sathi nahi.
      Karan dusara mage padala ki spardha sampte, mhanun spardha swatashi karavi..
      Ithe amacha boss parprantiyach ase nav fakt paristhiti janya aahe.. Anek marathi manse pan khup mothya hudyavar aahet.. Pan ji nahit..tyanchi paristhiti sanganara ha lekh..

  2. Mazya gelya 10 varshanchya engineering analysis software kshetratlya anubhavavarun sangato ki var rekhaTleli paristhiti vastavala dharun nahi. Anek thikani mi marathi loka junior, middle aani senior management level var baghitli aahet. Alikade marathi maNsachi marathi maNsanech ninda karaychi Toom nighali aahe. Jashi aatma-stuti vait, tashich ati aatma-ninda hi vaiTach. ‘Nindakache ghar asave shejari’ hyala hi kahi maryada aahetach.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here