MarathiBoli.in Competition – स्पर्धा
नमस्कार मित्रांनो,
आपल्या सहकार्यामुळेच या वर्षीचा सर्वोत्तम मराठी संकेतस्थळाचा इंडिब्लॉगर पुरस्कार मराठीबोली.इन ला मिळाला.
हे शक्य झाले ते आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आणि आपल्यातीलच काही मित्रांनी मराठीबोली.इन वर लिहीलेल्या लेखांमुळे.
म्हणूनच मराठीबोली.इन, मराठीब्लॉग्स.इन आणि मराठीबोली.कॉम या संकेतस्थळामार्फत एक लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
बक्षिसे.
प्रथम परितोषिक – शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय + मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १०० ची सवलत.
द्वितीय परितोषिक – मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १५० ची सवलत.
तृतीय परितोषिक – मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये ५० ची सवलत.
स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे.
१. लेख फक्त मराठी भाषेतील असावेत.
२. लेख स्वलिखित असावेत आणि इतर कुठेही प्रसिद्ध झालेले नसावेत. (आपला स्वताचा ब्लॉग वगळून, आपल्या ब्लॉग/संकेतस्थळाचे नाव लेखात देण्यात यावे).
३. लेखाचे विषय :- कथा, कविता, ललित, विनोद, आरोग्य, पर्यटन, निसर्ग, खवय्येगिरी, चित्रपट, नाटक, साहित्य, तंत्रज्ञान, मराठी संस्कृती, दिवाळी.
४. विषयाशी निगडीत चित्रे लेखामध्ये समाविष्ट करावीत.
५. आपण कितीही लेख पाठवू शकता.
६. ३० नोव्हेंबर पर्यन्त पाठवण्यात आलेले लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
७. विजेते लेखाला ऑनलाइन मिळणार्या प्रतिसादावर आणि मराठीबोली.इन संचालकमंडळाच्या मता नुसार घोषित करण्यात येतील. (८० – २० सूत्रा प्रमाणे)
८. मराठीबोली.इन, मराठीबोली.कॉम किंवा मराठीब्लोग्स.इन या संकेतस्थळांच्या संचालकांपैकी कोणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.
९. स्पर्धेचा निकाल ३ डिसेंबर ११ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.
* स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचे हक्क मराठीबोली.इन कडे राखीव.
* कोणताही लेख प्रसिद्ध करण्याआधी गरज असल्यास संचालक त्यात काही तांत्रिक बदल करू शकतात. (मुळ लेखा मध्ये कोणताही बदल होणार नाही)
स्पर्धेत भाग घेण्यासाठी मार्गदर्शन.
१. सर्वप्रथम येथे क्लिक करून मराठीबोली.इन वर नोंदणी करावी.
२. नोंदणी नंतर लॉगिन करावे.
३. खालील चित्रा प्रमाणे पेज दिसेल.
४. आता POSTS -> ADD NEW वर क्लिक करावे.
५. आपल्या लेखाला/पोस्टला योग्य ते नाव देऊन लेख लिहावा.
किंवा.
आपण आपले लेख social@marathiboli.in या मेल आयडी वर ईमेल ने पाठवू शकता.
कोणतीही अडचण आल्यास या पोस्ट खाली प्रतिक्रिया/ कमेन्ट द्यावी किंवा social@marathiboli.in या मेल आयडी वर संपर्क साधावा.
HOW TO TYPE IN MARATHI ?
पुढील लिंक पहावी.
http://marathiboli.in/how-to-write-in-marathi-language-on-internet/