Marathi Natak – लेकुरे उदंड झाली

1
4169

हिन्दी सिनेमा प्रमाणेच मराठी नाटकांमध्ये सुद्धा आता रिमेकचे प्रमाण वाढले आहे. अनेक मराठी जुनी नाटके पुन्हा एकदा नवीन कलकारांसह पुन्हा एकदा रंगमंचावर येऊ लागली आहेत.

Marathi Natak lekure udand zali

Marathi Natak lekure udand zali

पू.ल. देशपांडे यांच्या वार्‍यावरचीवरात या नाटकाचे यशस्वी पुनुरूत्जीवन केल्यानंतर नाट्यसंपदा आता रंगमंचावर घेऊन येत आहे … वसंत कानीटकर लिखित “लेकुरे उदंड झाली”(Lekure Udand Jhali). १९६६ सारी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने १००० प्रयोगांचा टप्पा गाठला होता.

आता इतक्या वर्षान नंतर नाट्यसंपदा ही संस्था हे नाटक पुन्हा एकदा नव्या रंगत ..नव्या ढंगात आणि नवीन कलाकारांसह घेऊन आली आहे. नुकतेच जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या शुभ हस्ते या नाटकाचा शुभारंभ झाला.

लेकुरे उदंड झाली(Lekure Udand Jhali) या नाटकमध्ये सुमित राघवन आणि त्याची पत्नी  चिंमयी हे या नाटकमधून प्रथमच रंगमंचावर एकत्र येत आहेत. या नाटकचे दिग्दर्शन अद्वैत दादारकर यांनी केले आहे.

[tube]zbGdWuOxOyc[/tube]

लेकुरे उदंड झाली(Lekure Udand Jhali) हे नाटक पुन्हा एकदा यशस्वी होओ..या साथी मराठीबोली.इन(MarathiBoli.In) कडून लेकुरे उदंड झाली(Lekure Udand Jhali) ला शुभेच्छा..

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here