Marathi Movies in multiplex
एका हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना अघोषित बंदी घालण्यात आली आहे. या अन्यायाविरुद्ध निर्मात्यांसह शिवसेना-मनसेने आवाज उठवला आहे.
चित्रपट वितरणातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एक था टायगर’ या हिंदी चित्रपटाला राज्यातील सर्व शो हवे आहेत. त्यामुळे सर्व मराठी चित्रपटांवर मल्टीप्लेक्समध्ये अघोषित बंदी घालण्यात आली आहे.
बंदीचा पहिला फटका बसला ‘देऊळ’चे निर्माते अभिजीत घोलप यांच्या ‘भारतीय’ चित्रपटाला.
या अन्यायाविरुद्ध चित्रपटाच्या कलाकारांची टीम उद्या लोअर परळ येथील पीव्हीआर फिनिक्स मल्टीप्लेक्स मालकांची भेट घेणार आहे. या लढाईत शिवसेना आणि मनसेनेही उडी घेतली असून शासनाला यासाठी २४ तासांची डेडलाईन दिली आहे. यानंतरही मराठी चित्रपटांवरील अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
– अमेय खोपकर , अध्यक्ष, मनसे चित्रपट सेना
* ‘भारतीय’ चित्रपटाच्या समूहाशी आमचे बोलणे झाले. त्यासंबंधी आधीच लोअर परळ येथील पीव्हीआर मल्टीप्लेक्स मालकांना आम्ही पूर्वसूचना दिल्या आहेत. तरीही चित्रपटांवर बंदी घातली तर योग्य ती कारवाई केली जाईल.
-अभिजीत पानसे, अध्यक्ष, भारतीय चित्रपट सेना
‘टायगर’ला हुसकावले, ‘भारतीय’ सुरुच राहणार !
सलमान खान आणि कटरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘एक था टायगर’ सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे यासाठी देशभरातील मल्टिप्लेक्सने दार उघडे करुन दिले होते यामुळे इतर सिनेमांसह मराठी सिनेमे मल्टिप्लेक्स बाहेर पडणार होती. याचा सर्वाधिक फटका शुक्रवारीच रिलीज झालेल्या ‘भारतीय’ सिनेमाला बसणार होता. पण आता पीव्हीआर थिएटरमधून भारतीय चित्रपट काढला जाणार नाही असं आश्वासन मनसे चित्रपट सेना आणि भारतीय चित्रपट सेनेला देण्यात आलंय. सेना-मनसेच्या दणक्यानंतर मल्टिप्लेक्स मालकांची नरमाईची भूमिका घेतली आहे.
‘एक था टायगर’ या सिनेमाला जास्त शो मिळवून देण्यासाठी मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्सनं दारं बंद केल्याचा आरोप चित्रपट निर्मात्यांनी केला होता. याचीच दखल घेत मनसे चित्रपट सेना आणि भारतीय चित्रपट सेना यांची फिनिक्स मिल मधल्या पीव्हीआर थिएटरमध्ये धडक दिली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आलं. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा परवा म्हणजे 15 ऑगस्टला देशभरात रिलीज होतोय. या सिनेमासाठी मुंबईतील तसेच राज्यातील इतर मल्टिप्लेक्स मालकांनी या थिएटरमधील संपूर्ण शो मोकळे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा मोठा फटका मराठी चित्रपटांना बसला असता