Marathi Movie VanshVel Review :- वंशवेल – एक कौटुंबिक सामाजिक चित्रपट
सुनील मानकर निर्मित आणि दिवंगत दिग्दर्शक राजीव पाटील दिग्दर्शित वंशवेल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
खुप दिवसांनी एक कौटुंबिक मराठी चित्रपट पडद्यावर येत आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे हा फक्त कौटुंबिक चित्रपट नसून त्यात एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा एकदम उत्तमच. राजीव पाटील यांचे दिग्दर्शनही उत्तम.
चित्रपटात किशोर कदम, सुशांत शेलार, अंकुश चौधरी, नम्रता गायकवाड, शंतनु गंगाणे, मनीषा केळकर, विद्या कारंजीकर, उषा नाईक यांच्या मुख्य भुमिका आहेत .
चित्रपटाची कथा आहे ती दादासाहेब देशमुख यांच्या कुटुंबाची, दादासाहेब हे एक उद्योगपती आहेत, त्यांचे एक हॉस्पिटलही आहे.
बाहेर मोठे उद्योगपती असलेले दादासाहेब, घरात मात्र फारच संकुचित किंवा मागासलेल्या विचारसरणीचे आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. दादासाहेबांच्या कुटुंबात त्यांची पत्नी दोन मुले आणि दोन सुना आहेत.
सर्वकाही व्यवस्थित चालू असताना, दादासाहेबांच्या थोरल्या सुनेला होणारे मूल हे एक मुलगी आहे हे लिंग परीक्षण चाचणीद्वारे समजते. साहजिकच पुरुषप्रधान संस्कृतीचे पुरस्कर्ते असलेले दादासाहेब होणार्या मुलीला विरोध करतात. पुढे काय होते ? हे पहाण्यासाठी आपणास चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा लागेल.
चित्रपटाची कथा उत्तम आहे, पण चित्रपटाला राजीव पाटील टच वाटत नाही. कलाकारांचा अभिनय साधारण आहे.
तरीही आपण हा चित्रपट पहा आणि आपल्याला हा चित्रपट कसा वाटतो ते आम्हाला कळवा.