Marathi Movie Sat Na Gat Review :- मराठी चित्रपट सत ना गत चित्रपट परीक्षण
सध्या मराठी चित्रपट सृष्टीत एका मागोमाग एक जुन्या कादंबर्यांवर आधारित चित्रपट येत आहेत, श्री पार्टनर, दुनियादारी नंतर राजन खान यांच्या सुप्रसिद्ध सत ना गत या कादंबरीवर आधारित सत ना गत हा चित्रपट मागील आठवड्यात प्रदर्शित झाला .
सत ना गत या चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, सायाजी शिंदे आणि नवोदित अभिनेत्री पाखी हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा कोल्हापुरात २० वर्षांपूर्वी घडते, असे असून देखील चित्रपटातून समोर आलेले प्रश्न आजच्या काळातीलच आहेत.
सत ना गत हा चित्रपट कथा आहे एका नामी नामक सुंदर तरुणीची, नामीचे लग्न झालेले आहे आणि तिला दोन मुले देखील आहेत, नामीचा नवरा मात्र घरी बसून असतो, जुगार खेळणे हे त्याचे काम.
नामी मात्र घर कामे करून पैसे मिळवते आणि घर चालवते. अश्यातच एके दिवशी नामीच्या घरा जवळील तलावात एक मृतदेह सापडतो. या खुनाचा तपास करण्यासाठी इंस्पेक्टर दिनेश आसुले(महेश मांजरेकर) यांची नेमणूक करण्यात येते. सुरुवाती पासूनच इंस्पेक्टर दिनेश आसुलेंचा नामीवर डोळा असतो. या खुनाच्या आरोपात ते नामीला अडकवून अटक करतात आणि तुरुंगात तिच्यावर बलात्कार करतात.
दुसर्याच दिवशी ही बातमी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होते. ही बातमी प्रकाशित करणारे पत्रकार उत्तम वाभळे(भरत जाधव) यांना नामीला न्याय मिळवून द्यायचा असतो तर संपादक शिंदे(सयाजी शिंदे) यांची नामीवर नजर असते. नंतर संपादक शिंदे नामीवर बळजबरी करतात.
नामीवर बळजबरी चा प्रकार दोनदा घडतो त्यामुळे नामीला आता न्याय कसा मिळणार हा प्रश्न चित्रपटात समोर येतो, आणि हा न्याय मिळाल्यावर नामीच्या आयुष्यात काय बदल होणार आहे? बलात्काराच्या घटनेचे राजकारण कसे केले जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
[tube]HDYmLvdan5U[/tube]
सत ना गत चित्रपट एका सामाजिक प्रश्नाचे वास्तव चित्र उभे करण्यात यशस्वी होतो.
चित्रपट कथे मध्ये सशक्त असला तरी तांत्रिक बाबींमध्ये जेमतेम ठरतो. सर्व मुख्य कलाकारांचा अभिनय उत्तम.
चित्रपटाचा शेवट तितकासा परीणामकारक करण्यात दिग्दर्शक अयशस्वी ठरतो.
तरीही सत ना गत हा चित्रपट नक्कीच पाहण्या सारखा आहे.
Movie original
सत ना गत