Marathi Movie Baji Review – बाजी चित्रपट परीक्षण
निर्मिती – अरुण रंगाचारी. विवेक रंगाचारी, अमित अहिरराव. सुहृड गोडबोले, निखिल महाजन, ऋषिकेश कुलकर्णी.
दिग्दर्शक – निखिल महाजन
स्टुडिओ – डीएआर मोशन पीक्चर्स
कलाकार – श्रेयस तळपदे(बाजी) अमृता खानविलकर(गौरी), जितेंद्र जोशी(मार्तंड)
लेखक – निखिल महाजन आणि सुहृड गोडबोले
संगीत – आतिफ अफजल
मराठी चित्रपटातील पहिला सुपर हीरो अशी प्रसिद्धी मिळालेला बाजी ..
चित्रपटाची सुरुवात आकर्षक, सचिन खेडेकर यांच्या आवाजात सांगितलेली बाजीची गोष्ट सुरुवातीपासून रसिकांना बांधून ठेवते.
चित्रपटाची कथा घडते कोकणातल्या श्रीरंगपूर या गावामध्ये, श्रीरंगपूरमध्ये राहणारा चिदू म्हणजेच चिदविलास याचे गौरीवर मनापासून प्रेम असते. पण चिदू प्रामाणिक असला तरी तो शूर नव्हता त्यामुळे गौरी ही त्याला फक्त आपला मित्र मानत असते, तर तिच्या लहानपणी तिचा जीव वाचवणार्या बाजीवर प्रेम करत असते. सध्या गावात फक्त बाजीच्या दंतकथा राहिल्या असतात तरी गौरीचा बाजीवर विश्वास असतो, तो कधी तरी येईल असा तिचा विश्वास असतो.
मार्तंड म्हणजे गावामध्ये कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारा एक तरुण, याचा फक्त एक मित्र इंस्पेक्टर महेश.
एकदा गावात फिरताना मार्तंडला जमिनीमध्ये पुरलेल्या काही सोन्याच्या मोहरा मिळतात आणि सुरू होतो खजिना शोधण्याचा खेळ. पुढे हाच खजिना शोधत असताना मार्तंड च्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मार्तंडला मिळते.
कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेला मार्तंड , संपूर्ण गावासाठी एक राक्षस बनून समोर येतो.
यावेळी पुन्हा श्रीरंगपूर गावाला वाचवायला बाजी परत येईल ? गौरीला तिचा बाजी भेटेल? चिदू चे प्रेम यशस्वी होईल ? या प्रश्नांच्या उत्तरासाठी चित्रपट पहा जवळच्या चित्रपटगृहातच…
चित्रपट तांत्रिक दृष्ट्या चांगली कामगिरी बजावतो. कॅमेरा ही उत्तम. चित्रपटाचे संगीत अधिक उत्तम करता आले असते, चित्रपटाचे मुख्य गाणे सोडले तर इतर कोणतेच गाणे प्रभावीही ठरत नाही आणि लक्ष्यात पण राहत नाही. चित्रपटाची लांबी जास्त आहे पण तरीही गाणी सोडली तर चित्रपट रसिकांना बांधून ठेवण्यात यशस्वी होतो.
श्रेयस तळपदे आणि अमृता खानविलकर दोघांचाही अभिनय उत्तम , जितेंद्र जोशींनी साकारलेला मार्तंड ही उत्तम .
चित्रपटात रवी जाधव(दिग्दर्शक – बीपी , टाइम पास ) आणि नागनाथ मंजुळे(दिग्दर्शक – फॅड्रि) या दोन दिग्दर्शकांनी केलेल्या छोट्या भूमिकाही उठून दिसतात.
The Marathi film industry churns out close to 100 movies a year as compared to 1000+ Hindi movies that are released every year. While the cost of production of a mid-budget Marathi movie is Rs 1.5 crore, the budget touches Rs 3.5 crore for a big budget Marathi movie. On the other hand, promotions budgets are in the range of Rs 1.5 – 2 crore, which includes advertising, distribution and release cost. I am conducting a survey in which I am trying to find out what attracts viewers to watch Marathi movie. Please take out few minutes of your busy schedule & fill the survey. Link for the survey is: http://goo.gl/forms/etU6FM9Ehr