Marathi Kavita Shaleche Divas (शाळेचे दिवस )

3
32811

Marathi Kavita Shaleche Divas

शाळेचे दिवस

Marathi Kavita

ही कविता मी शाळा चित्रपट पहिल्या नंतर पूर्ण करू शकलो . ह्या कवितेत आपल्या शाळेच्या जीवना मध्ये आणि आपल्या शाळे नंतर च्या जीवना मध्ये जो परिवर्तन घडतो त्या बद्दल लिहले आहे . आशा आहे की सर्वांना आवडेल.

गेले ते शाळे चे जीवन
ओरडत जन गण म्हणण्याचे निश्पाप दिवस…।Marathi Kavita

ते नवे कोरे शाळेचे कापड
ते घालुन लवकर शाळेत पोहचण्याची धडपड
आता राहिली आहे ती फ़क़्त दग दग
अर्रे कुठे सफलतेची गाडी सुटली नाहीकी बघ

गेले …।

शाळेत वाचले एकत्र राहण्याचे धडे
एकमेकाला जपण्यासाठी करावया लढे
आता आहे फ़क़्त एकमेकांशी भांडणे
अर्रे मिळेल ते सारे स्वतः साठी एक्वतने

गेले …।

त्या वेळचा खेळ काही निराळाच होता
मजा मस्तीच्या लाटांचा जणू काही मेळावा होता
आता आहे तो फ़क़्त स्पर्धेचा बाझार
जीत हार्च्या गरजे पोटी पडते मित्रां  मध्ये दरार

गेले …।

शाळेत मनात बहरली मातृभाषेची ओढ
तो लळा शिकण्याचा होता किती गोड
आता शिक्षणाचे झालेत किती घोळ
मातृभूमीच्या पेक्षा वाझतो पैश्यांचा ढोल

गेले …।

ह्या कवितेचा सार्थ एवढाच कि आपण किती संपत्ती, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळवू. पण जे चांगले गुण आपण शाळेत शिकतो ते आपल्या संपूर्ण आयुष्य भर राहिले पाहिजे

……. सागर दिवटे .

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here