How To Earn Money Online – घर बसल्या पैसे कमवा…काय खरे काय खोटे

5
17683

Earn Money from Internet

howtoearnmoney

घर बसल्या महिन्याला ८ ते १० हजार कमवा, मार्केटिंग नाही, ऑफिस नाही, कोणतीही अट नाही, फक्त इंटरनेट कनेक्शन…
अश्या प्रकारच्या Advertise आपण रोज बघतो, कधी रेल्वेच्या डब्यामध्ये, तर कधी इंटरनेटवर..
पण काय हे खरे आहे…?
फक्त इंटरनेट वर रोज २-३ तास काम करून ८-१० हजार कमावता येतात…??
मित्रानो जर असे खरे असते…तर विचार करा…तुमच्या आजू बाजूला Computer Engineering केलेले, दिवसभर इंटरनेट वर बसणारी बेरोजगार किंवा नोकर्या शोधणारी मंडळी नसती दिसली..
पण याचा असा अर्थ होत नाही…की इंटरनेट वरून कमावताच येत नाही…
तुम्ही खरच कमवू शकता ८-१० हजार रुपये…ते पण फक्त २-३ तास काम करून…पण ते एवढे सहज आणि सोपे नाही आहे..
आणि त्यासाठी तुम्ही काय करता, तुमची शैक्षणिक पात्रता..यावर देखील हे अवलंबून आहे..
या साठी खूप मेहनत करण्याची तयारी पाहिजे…
जसे एखादे झाड लावताना … ते झाड लावणार विचार करतो..या झाडाची फळे मला काही वर्षांनी मिळणार आहेत…अगदी तसेच..
पण त्यासाठी त्या झाडाची रोज निगा राखणे, त्याला पाणी घालणे..ही कामे तर करावीच लागतात…
खरे तर इंटरनेट वरून पैसे कमावण्याचे बरेच मार्ग आहेत…
म्हणूनच मी हे सदर सुरु केले आहे…
यातील काही मार्ग..पुढील प्रमाणे..
१. Online Advertising(Google Adsense)
२. FreeLancing – स्वायत्त
३. Data uploading – संगणकावर महिती भरणे
४. Blogging – ब्लोग लिहिणे.
५. E-Commerce – इंटरनेट वर उत्तपादने विकणे..
अश्या प्रकारची अनेक कामे करून आपण इंटरनेट द्वारे पैसे कमवू शकतो..
वरील सर्वांची थोडक्यात माहिती देत आहे..
या पुढील सदरा मध्ये आपण त्यांची पूर्ण माहिती मिळवूया..
१. Online Advertising
आता Online Advertising हे सर्वाना परिचयाचे झाले आहे..अगदी ही माहिती वाचत असताना आजू बाजूला..ज्या Advertise दिसतात त्या आहेत  Online  Advertise … जेव्हा कोणीही वाचक, यावर क्लिक करतो त्याचा फायदा माहिती लिहिणार्याला अर्थात ब्लोग लिहिणार्याला होतो..
२. FreeLancing – स्वायत्त
इंटरनेट  वरून एखाद्या कंपनीचे किंवा कोण एकाचे काम पैशाच्या मोबदल्यात करून देणे…म्हणजे FreeLancing ..
३. Data uploading – संगणकावर महिती भरणे
इंटरनेट  वर अश्या अनेक कामाच्या संधी उपलब्ध आहेत जिथे संगणकावरून माहिती भरून पैसे कमावता येऊ शकतात..
४. Blogging – ब्लोग लिहिणे
सर्वात सोपा असा हा मार्ग आहे…जर तुम्ही एखाद्या विषयात पारंगत असाल, आणि तुम्हाला संगणकाची बेसिक माहिती असेल..तर हे तुमच्या साठी आहे..याविषयी आपण पुढील सदरात जाणून घेऊया…
५. E-Commerce – इंटरनेट वर उत्तपादने विकणे..
तुम्ही बनवलेल्या वस्तू, संपूर्ण जगात, देश विदेशात विकण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय …तो पण कोणतेही दुकान नसताना…
अगदी माफक दरात…
जर आपल्याला असे इंटरनेट वरील दुकान काढायचे असेल तर संपर्क साधा:- admin@marathiboli.com
ही झाली थोडक्यात माहिती…
या पुढील सदर वाचल्यावर..तुम्ही स्वत इंटरनेट वरून…काहीतरी नक्कीच कमवू शकता…

5 COMMENTS

    • आपली संगणकावर माहिती भरणे याबद्दल अधिक माहिती मिळावी

  1. पवार टुर्स आणि ट्रॅव्हल्स पुणे आमच्या येथे सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळतील.
    आमचेकडे पुणे ते मुंबई विमानतळ(पिक-अप/ड्रॉप) साठी गाडी मिळेल.
    वेबसाईट- http://www.pawartravels.com

  2. मला डेटा एन्ट्री चे काम पाहिजे ते पण फ्री ऑफ कॉस्ट असेल तर कळवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here