बर मग ? – Marathi Kavita Bar Mag

0
912

Marathi-Katha-Bar-Mag

कवी – मुकुल आव्हाड
संपर्क – mukulavhad007@gmail.com

बर मग ? – Marathi Kavita Bar Mag

अघटितच सार घडत असत का?
डोळ्यांना आपल्या चांगलं दिसत असत का?
मांजर आडवी जाणे म्हणजे अपशकून का?
तिलाही ऑफिस ला उशीर झाला असेल ना?
हातांच्या रेषांवर कुठे असत भविष्य?
राकट काळे हात दाखवतात कष्ट.
दगडाच्या मूर्तीला काय फरक पडतो?
दगड पुजताना माणूस माणसात असतो?
आताच तुम्ही सांगितल्या आयुष्यातल्या अडचणी,
साधारणतः कारणांची कादंबरीच होईल,
पण उपाशी पोटी झोपणार्याला ती वाचून दाखवाल का?
जर अडचणी नसल्या तर आयुष्य जगून दाखवाल का?
देवाला वनवास आहे,
दानवांचा ऱ्हास आहे,
सामन्यांना त्रास आहे,
अहो डोळे उघडून बघा जरा, ज्याला डोळे नाहीत,
त्याच्या कल्पनेला केसराचा सुवास आहे…..
– मुकुल आव्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here