कवी – हर्षदा जोशी पुराणिक
संपर्क – harshadajoshi55@gmail.com
आम्ही साथी – Marathi Kavita Amhi Sathi
न सोडते कदापि
कोणास कधी एकटी
मी सखी सावली
भासे बहीण धाकटी …
नाण्याच्या बाजूसम
सुखदुःख ‘आम्ही साथी ‘
सुख मागितल्या मिळेना
दुःख लागते हे पाठी …
साथ स्वतःला स्वतःची
हात घेऊन हाती
क्षितिजे कवेत घेण्या
गाईन ध्येयाची आरती…
सौंदर्य टिपण्या त्रिभुवनाचे
साथ देई नेत्र ज्योती
तनूवर धरुनी छाया
श्वासांची आमरण प्रिती …
दिधले आम्हा ‘जीवन ‘
निसर्ग आपुला सारथी
तरावया तरूंचे रोपण
संकल्प घेऊ या हाती …