माझ्यातील मी… – Marathi Kavita

1
665
Marathi Kavita – Mazyatil Mi – माझ्यातील मी…

Marathi Kavita – Mazyatil Mi – माझ्यातील मी…

कवयित्री – विशाखा साली

हरले जरी कधी मी
त्यामागील कारण ओळखायचंय मला….
कारण माझ्या स्वप्नांत
पूर्णतः गुंतायचंय मला…..!

          भावनांनी जखडलेली
          बंधने नकोय मला.....
          कारण माझ्यातील मलाच 
          स्वच्छंदी बनवायचंय मला....!

वेळेनुसार बदलणारे
स्वार्थी प्रेम नकोय मला….
कारण माझ्याच प्रेमात
पडायचय मला…….

           सर्वांच्या विचारांचा विचार
           नाही करायचाय मला....
           कारण माझ्याच विचारांत 
           मग्न व्हायचंय मला.....!

असंख्य परीस्थितींना सांभाळून
प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचाय मला…
कारण या माणुसकीशून्य जगात
जगायचंय मला…..!!

        --------✍️Vishakha Sali

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here