स्पर्श तिचा – Marathi Kavita

0
224
Marathi Kavita- Sparsh Ticha – स्पर्श तिचा

Marathi Kavita – Sparsh Ticha – स्पर्श तिचा

कवि – क्षेत्रे शुभम कृष्णा

बोलताना तिच्याशी
भास का तर व्हावे
नवे नवे जगातले
अनवधानाने सामोरे यावे

भांबावलेल्या विश्व सोहळ्याने
अलगद तरंग छेडावे
मधात बुडालेल्या करंगळीचे
कायमचे मध होऊन जावे

त्यात चांदण्याची
गफलत होऊन जायची
तिची तिचीच लुकलूकाट
मनी चमकायची

आनंदलेल्या हृदयाचे
भाकीत नव्हते कधी
न ठरवता येते जे
त्यावर जिव जडविला ना आधी

रुसले काहीसे माझे
स्वभाव चिडचिडा झाला
तिच्या समिप नसतो तेव्हा
उगीच कावराबावरा भ्याला

हसून तिने टाकलेल्या
पाकळीला जपने
शब्दांविना पुस्तकात
सुकलेला गुलाब असणे

वेदनेने सोडला हात तेव्हा
बोटाने तिच्या
अलगद बोटे भेदली जेव्हा
भास क्षणांना गुदगुदून यावे
मनमोकळे न लाजता
भान हरवून हसावे

तिने जगण्यास खरे द्विप दिले
त्यावर घर असे
दोन दोन चाराचे
छत झाले
वेगळे सारे अवेगळे
समिप ते सारे निराळे

तिच्या योगे माझे सुख झोपे
तिच्या पायतळीची
धूळ चकाकते
गुलाबीच नव्हे अनेक रंगाने रंगवते

जेव्हा जेव्हा ती
भेटण्या धावून येते
कुठेतरी पापणी ओल ओली करते
तिने अलगद त्या दवाला कुरवाळणे
आमचे आमच्यात विसावने

दूर दूर पैल गाठने
हरवून सर्व चिंता
आमचे अनाठाई
गप्पेत गप्पा वाढवणे

सारे असेच चालते
गाडी न जाणे कुठे कसे
नेहून आम्हा ठेवते
हिरवळीत त्या
आम्ही एकट्यात
एकटेपणा शोधतो
नकळत आमच्यातील
नवाच अंकुर उमलतो

स्वतः देखील न ठाऊक
असा माझाच पैलू मज दिसतो
म्हणून तिला मी माझा आरसा म्हणतो
त्याच्यापुढे कुठे क्षितिज हरवतो
अंगातील नसांना रक्त- श्वासापेक्षा
तिचा स्पर्श जास्त जगावतो
_ कवी समर्पण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here