Marathi Kavita – Vastav – वास्तव
कवी: अमित वि. पवार
क्षण चोरावेत लोभांनी आयुष्याचे
स्पर्धा जीवघेणी अपेक्षांची
खर्च मी करतो कि होतो माझ्या वेळेचा
फसवणूक नक्की कोणाची कोणाकडून कोणाची
मुखवटे दिसतात बोलणारे, हसणारे
अंतःकरण घायाळ रक्ताळलेली
नाती माझ्यासाठी कि मी नात्यांसाठी
फसवणूक नक्की कोणाची कोणाकडून कोणाची
झोकून देतो पायाशी तुझ्या
हाडतुड करून दूर लोटले इतरांना
घडवलेस तू मला कि मी मला
फसवणूक नक्की कोणाची कोणाकडून कोणाची
…..अमित पवार
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-86/ […]